UPSC : सायंटीस्ट, मेडीकल ऑफीसर्स इ. पदांसाठी पदवी/उच्च पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – सायंटीस्ट-बी (फिजिक्स)
पदभरतीचा विभाग – मिनिस्ट्री ऑफ कंज्युमर अफेअर्स इ.
पदसंख्या – २ (ओपन १, अज १)
पात्रता – उमेदवार उच्च पदवी (फिजिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार इंजि पदवी (इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/मेटलर्जी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३५ वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी – ₹१५६००-३९१००/- + ग्रेड पे ₹५४००/-
२) पदाचे नाव – रिसर्च ऑफीसर्स (केमिस्ट्री)
पदभरतीचा विभाग – मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेलफेअर
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार उच्चपदवी (ऑर्गनिक केमिस्ट्री) संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी – ₹९३००-३४८००/- + ग्रेड पे ₹४८००/-
३) पदाचे नाव – सायंटीस्ट-बी (केमिस्ट्री)
पदभरतीचा विभाग – मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेलफेअर
पदसंख्या – अज १
पात्रता – उमेदवार उच्चपदवी (केमिस्ट्री) संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३५ वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी – ₹ १५६००-३९१००/- + ग्रेड पे ₹५४००/-
४) पदाचे नाव – सायंटीस्ट-बी (फिजिक्स)
पदभरतीचा विभाग – मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
पात्रता – उमेदवार उच्चपदवी (केमिस्ट्री) संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३५ वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी – ₹ १५६००-३९१००/- + ग्रेड पे ₹५४००/-
५) पदाचे नाव – इन्व्हेस्टीगेटर ग्रेड
पदभरतीचा विभाग – मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
पात्रता – उमेदवार उच्चपदवी (इकॉनॉमिक्स/ ॲप्लाईड इकॉनॉमिक्स/बीझनेस इकॉनॉमिक्स/इकॉनोमेट्रीक्स) उत्तीर्ण असावा.
वय – ३० वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी – ₹९३००-३४८००/- + ग्रेड पे ₹४६००/-
६) पदाचे नाव – असिस्टंट केमिस्ट
पदभरतीचा विभाग – मिनिस्ट्री ऑफ माईन्स
पदसंख्या – ३ (ओपन २, अजा १)
पात्रता – उमेदवार उच्चपदवी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा. संबंधित कामचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी – ₹९३००-३४८००/- + ग्रेड पे ₹४६००/-
७) पदाचे नाव – मेडीकल ऑफीसर्स (आयुर्वेदा)
पदभरतीचा विभाग – म्युनिसिपल कार्पोरेशन ऑफ दिल्ली
पदसंख्या – ४० (ओपन १७, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ११, अजा ६, अज ३) अपंग २
पात्रता – उमेदवार पदवी (अर्युर्वेदा) उत्तीर्ण असावा. मेडीकल कौन्सीलकडे नोंदणी असणे आवश्यक.
वय – ३५ वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी – ₹१५६००-३९१००/- + ग्रेड पे ₹५४००/-
वयोमर्यादा – उमेदवारांचे दिनांक ०२ मे २०२४ रोजी वयामध्ये ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. शासकिय / निमशासकिय/ विभागीय ओपन प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना वयात, ५ वर्षे ओबीसी ८ वर्षे तर अजा/अज कर्मचाऱ्यांना वयात १० वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा २) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व त्या सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची १०० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी ओपन उमेदवारांना किमान ५० गुण, ओबीसी ४५ गुण तर अजा/अज/ अपंग उमेदवारांना किमान ४० गुण मिळणे आवश्यक. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार प्रवासखर्च दिला जाईल.
परीक्षा फी – ओपन/ओबीसी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹२५/- अशी असून ती नेटबँकिंग / क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. याशिवाय उमेदवार स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरू शकतात. अजा/ अज/ अपंग/ महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाईटवरून दि. ०२ मे २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फोटो, सही तसेच आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो, सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) वयाचा दाखला (१० वी प्रमाणपत्र) ५) जात प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसा दाखला ७) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र. मुलाखतीच्या वेळेस ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊटसोबत परीक्षा फी ई-रिसीट, वरील सर्व प्रमाणपत्रे, नावात बदल असल्यास गॅझेट इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी मुलाखतीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी उमेदवारांनी www.upsconline.nic.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. ०२ मे २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *