Territorial Army Kolhapur Soldier G.D vacancy | प्रादेशिक सेना कोल्हापूर सोल्जर जी.डी. भर्ती. - govtjobsu.com

Territorial Army Kolhapur Soldier G.D vacancy | प्रादेशिक सेना कोल्हापूर सोल्जर जी.डी. भर्ती.

omkar
8 Min Read

प्रादेशिक सेना कोल्हापूर सोल्जर जी.डी. भर्ती | Territorial Army Kolhapur Soldier G.D vacancy

प्रादेशिक सेना : ३१५० १०१ इन्फ्रंट्री बटालियन मराठा आणि १०९ इन्फ्रंट्री बटालियन मराठा (प्रादेशिक सेना) इ. : ७७४ सोल्जर, क्लार्क्स इ. पदांसाठी ८ वी / १० वी / १२ वी उत्तीर्ण पुरूष उमेदवारांना दि. ०४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भरतीसाठी बोलावित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – सोल्जर (जनरल ड्युटी),

पदसंख्या – ५६६,

 

२) पदाचे नाव – सोल्जर (हेअर ड्रेसर),

पदसंख्या – ३०,

 

३) पदाचे नाव – सोल्जर (कुक मेस),

पदसंख्या – ०२,

 

४) पदाचे नाव – सोल्जर (ईआर)

पदसंख्या – ०७,

 

५) पदाचे नाव – सोल्जर (आर्टीसन मेटलर्जी),

पदसंख्या – ४,

 

६) पदाचे नाव – सोल्जर (मसालची),

पदसंख्या – ०६,

 

७) पदाचे नाव – सोल्जर (वॉशरमन), 

पदसंख्या – ३२,

 

८) पदाचे नाव –  सोल्जर (शेफ),

पदसंख्या – ५४,

 

९) पदाचे नाव – सोल्जर (क्लार्क),

पदसंख्या – ३०,

 

१०) पदाचे नाव – सोल्जर (शेफ स्पेशल),

पदसंख्या – ०४,

 

११) पदाचे नाव – सोल्जर (स्टीवर्ड),

पदसंख्या – ०२,

 

१२) पदाचे नाव – सोल्जर (आर्टीसन वुड वर्क),

पदसंख्या – ०१, 

 

१३) पदाचे नाव – सोल्जर (हाऊसकिपर),

पदसंख्या – ३६,

 

पदानुसार पात्रता –

१) सोल्जर (जनरल ड्युटी) – उमेदवार सरासरी ४५ % गुणांनी १० वी उत्तीर्ण असावा. मात्र प्रत्येक विषयात किमान ३३ % गुण असणे आवश्यक.

२) पदाचे नाव – सोल्जर क्लार्क – उमेदवार सरासरी ६०% गुणांनी १२ वी उत्तीर्ण असावा. मात्र प्रत्येक विषयात किमान ५० % गुण असणे आवश्यक. तसेच उमेदवाराने १० वी किंवा १२ वीस इंग्रजी आणि गणित/अकौंट्स बुक किपिंग हे विषय अभ्यास अभ्यासलेले असणे आवश्यक व या विषयांमध्ये किमान ५० % गुण असणे आवश्यक.

३) पदाचे नाव – सोल्जर ट्रेड्समन (हाऊसकिपर / मेस किपर सोडून उर्वरीत सर्व पदांसाठी) – उमेदवार ३३% गुणांनी १० वी उत्तीर्ण असावा.

४) पदाचे नाव साठी – सोल्जर ट्रेड्समन (हाऊसकिपर/मेस किपर उमेदवार ३३ % गुणांनी ०८ वी उत्तीर्ण असावा.

 

शारीरिक पात्रता – उंची – किमान १६० सें.मी, वजन- किमान ५० कि. ग्रॅ. छाती – न फुगवता ७७ सें.मी., फुगवून ८२ सें.मी. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदरूस्त असावा.

वयोमर्यादा – भरती दिवशी उमेदवाराचे वय १८ ते ४२ वर्षांपर्यंत असावे.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड शारीरिक मोजमाप चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकिय चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईल. कागदपत्रे तपासणीमधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यामध्ये १.६ कि.मी धाव ५ मिनिट ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे, १० बीम पुल अप्स, ९ फूट रुंद खड्डा पार करणे आणि झीग झॅग बॅलन्स अशा चाचण्या घेण्यात येतील. यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ५० प्रश्न- १०० गुणांची असेल. यामध्ये सोल्जर जनरल ड्युटी/सोल्जर ट्रेड्समन पदांसाठी सामान्य ज्ञान (२० प्रश्न- ४० गुण), सामान्य विज्ञान (१५ प्रश्न-३० गुण), गणित (१५ प्रश्न-३० गुण) तर सोल्जर क्लार्क्स पदांसाठी सामान्य ज्ञान (०५ प्रश्न- १० गुण), सामान्य विज्ञान (०५ प्रश्न- १० गुण), गणित (१० प्रश्न-२० गुण), कॉम्प्युटर सायन्स (०५ प्रश्न- १० गुण), जनरल इंग्रजी (२५ प्रश्न- ५० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामध्ये किमान ४० % आणि सरासरी ५० % गुण मिळणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची टीए ग्रुप हेडक्वॉर्टर्समध्ये प्रीलिमिनरी इंटरव्ह्यू (पीआयबी) घेतली जाईल. यातील पात्र उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलविले जाईल. उमेदवारांना कागदपत्रे तपासणीच्यावेळी सर्व स्त्रोतांमधील मासिक उत्पन्नासह नोकरीबाबतचा तपशिल द्यावा लागेल. यातील पात्र उमेदवारांची सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) आणि मेडिकल बोर्डद्वारे वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल,

तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. १) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (१०वी पासूनची) २) वयाचा दाखला ३) एमबीबीएस डॉक्टरांकडून अलिकडचे शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र. ४) रहीवासी दाखला ५) केंद्र शासन / केंद्रशासित प्रदेश/राज्य शासन/निमशासकीय/खासगी क्षेत्र यातील निवृत्त उमेदवारांनी मुख्य कार्यालयद्वारा अधिप्रमाणित सेवा प्रमाणपत्र ६) ज्या उमेदवारांचा स्वत:चा रोजगार किंवा व्यवसाय आहे त्यांनी कमीत कमी किंमतीच्या नॉन ज्युडिशयल स्टॅम्प पेपरवर आणि जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर / राजपत्रित अधिकारी / कमिशन ऑफिसर यांनी साक्षांकित केलेले शपथपत्र सादर करावे लागेल. यामध्ये स्वयंरोजगाराचे स्वरुप व दरसाल मिळविलेले उत्पन्न अलिकडच्या आयकराच्या रिटर्नच्या साक्षांकित फोटोकॉपी व पॅनकार्ड, आधारकार्ड फोटोकॉपीसह सादर करावे. ७) पॅनकार्ड ८) आधारकार्ड ९) इन्कम टॅक्स रिटर्न १०) रेल्वे कर्मचान्यांनी ना-हरकत प्रमाणपत्र मुलाखतीच्यावेळी उमेदवारांनी पुढील कागदपत्रांच्या मूळ प्रती ११) उत्पन्नाचा दाखला

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कागदपत्रांच्या मुळ व छायांकित प्रतीसह भरतीसाठी हजर रहावे.

 

भरती युनिट –

• १०१ इन्फंटरी बटालिअन मराठा लिजिमेंट

• १०९ इन्फंटरी बटालिअन मराठा लिजिमेंट

भरती ठिकाण – शिवाजी विद्यापीठ, स्टेडीअम, कोल्हापूर (महाराष्ट्र)

भरती पदे – सोल्जर (जनरल ड्युटी) – ५४, सोल्जर (ट्रेड्समन क्लार्क सह) – २४

भरती दिनांक  – • ११ नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता – (कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर,  अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव)

• १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता – (अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ)

• १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता – (मुंबई शहर, बृहन्मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक)

• १३ नोव्हेंबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ – कागदपत्रे तपासणी, ट्रेड टेस्ट, वैद्यकीय तपासणीसाठी राखीव

• ११६ इन्फंटरी बटालिअन पँरा • ११५ इन्फंटरी बटालिअन महार १२५ इन्फंटरी बटालिअन गार्डस्

भरती ठिकाण – राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ग्राऊंड, बेलगावी (कर्नाटक) भरती पदे – सोल्जर (जनरल ड्युटी) – २५७, सोल्जर (ट्रेड्समन क्लार्क सह) – ५३

भरती दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता – (कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, नंदूरबार, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया)

• १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता – (मुंबई शहर, बृहन्मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ)

• १३ नोव्हेंबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ – कागदपत्रे तपासणी, ट्रेड टेस्ट, वैद्यकीय तपासणीसाठी राखीव

११६ इन्फंटरी बटालिअन पैरा ११८ इन्फंटरी बटालिअन अॅनडिअर्स १२३ इन्फंटरी बटालिअन पॅनाडिअर्स

भरती ठिकाण – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ग्राऊंड (देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड स्टेडीअम), नाशिक (महाराष्ट्र) भरती पदे – सोल्जर (जनरल ड्युटी) – ८१, सोल्जर (ट्रेड्समन क्लार्क सह) – ५७ -क्रिडा संकुल

भरती दिनांक – ११ नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता (कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, – अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव)

• १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता – (अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम,

• १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ०५.०० वाजता – (मुंबई बृहन्मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक)

 

भरती साठी घेऊन जाताना कागदपत्रे – 

१) १३ नोव्हेंबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ तपासणी, ट्रेड टेस्ट, वैद्यकीय तपासणीसाठी राखीव भरतीसाठी जातास सोबत घेऊन जाण्याची कागदपत्रे पासपोर्ट आकराचे फिक्या निळ्या रंगाची (स्काय ब्लू) बॅकराऊंड असलेले २० फोटो २) जन्म दाखला ३) डोमेसाईल प्रमाणपत्र ४) जातीचा दाखला ५) चारित्र्य प्रमाणपत्र ६) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ७) विवाहीत / अविवाहीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र ८) सैनिक / माजी सैनिक याचे पाल्य असल्यास रिलेशनशिप प्रमाणपत्र

 

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *