टाटा मेमोरिअल सेंटर : क्लार्क, नर्स इ. पदांसाठी १२ वी/डिप्लोमा/पदवी/उच्च पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – नर्स (महिला),
पदसंख्या – ५५ (ओपन ८, ईडब्ल्यूएस ११, ओबीसी २९. अजा ३, अज ४)
पात्रता – उमेदवार जीएनएम आणि डिप्लोमा ऑनकॉलॉजी उत्तीर्ण असावा किंवा बीएस्सी (नर्सिंग) उत्तीर्ण असावा. नर्सिंग कौन्सीलकडे नोंदणी असणे आवश्यक. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षे
२) पदाचे नाव – किचन सुपरवायझर,
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार पदवी (हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरींग टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षे
३) पदाचे नाव – टेक्निशिअन ‘C’ (आयसीयु/ओटी),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १२ वी सायन्स आणि डिप्लोमा (ओपरेशन थिएटर्स/डायलेसिस टेक्नीशिअन्स / इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षे
४) पदाचे नाव – टेक्निशिअन ‘A’ (हाऊसकिपींग),
पदसंख्या – ओपन १
वय – २७ वर्षे
पात्रता – उमेदवार १२ वी सायन्स आणि पदवी / डिप्लोमा (हॉटेल मॅनेजमेंट) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
५) पदाचे नाव – टेक्निशिअन ‘A’ (मोलेक्युलर पॅथोलॉजी),
पदसंख्या – ओबीसी १
वय – २७ वर्षे
पात्रता – उमेदवार १२ वी सायन्स आणि प्रमाणपात्रकोर्स / डिप्लोमा (मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
६) पदाचे नाव – टेक्निशिअन ‘A’ (इलेक्ट्रीकल),
पदसंख्या – अज १
वय – २७ वर्षे
पात्रता – उमेदवार १० वी आणि आयटीआय (इलेक्ट्रीशिअन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
७) पदाचे नाव – टेक्निशिअन ‘A’ (एन्डोस्कोपी),
पदसंख्या – ओपन १
वय – २७ वर्षे
पात्रता – उमेदवार १२ वी सायन्स आणि पदवी/ डिप्लोमा (एन्डोस्कोपी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
८) पदाचे नाव – स्टेनोग्राफर
पदसंख्या – ६ (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३)
वय – २७ वर्षे
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. लघुलेखन गती ८० शप्रमी आवश्यक. टायपिंग गती ४० शप्रमी आवश्यक. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
९) पदाचे नाव – लोअर डिव्हीजन क्लार्क
पदसंख्या – ३ (ईडब्ल्यूएस १, ओबीसी २)
वय – २७ वर्षे
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. ८ संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयात सवलत – उमेदवाराचे वय दि. ०७ मे २०२४ रोजीचे धरले जाईल. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, तर व अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात क नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी ₹९३००-३ ३४८००/- + ग्रेड पे ४६००/-, पद क्रमांक २ साठी ₹ ९३००-३४८००/- + ग्रेड पे ४२००/- पद क्रमांक ३ व ८ साठी ₹५२००-२०२००/- + ग्रेड पे २४००/- तर उर्वरित सर्व पदांसाठी ₹५२००-२०२००/- + ग्रेड पे १९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इ. दि. ०७ मे २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) वेतनश्रेणीशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/स्कील टेस्ट/ मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार स्कील टेस्ट/ मुलाखत घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन, वैद्यकीय चाचणी घेऊन आणि चारित्र्य पडताळणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रेमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना ₹३००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/महिला/माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.tmc.gov.in या वेबसाईटवरून दि. ०७ मे २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावेत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाहीं.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायीक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ५) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र
उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट, परीक्षा फी ई-रिसीट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित केलेल्या प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकिय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीवेळी ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.tmc.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. ०७ मे २०२४,
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *