Tata Memorial Cents : Nurse, Clerk etc. - govtjobsu.com

Tata Memorial Cents : Nurse, Clerk etc.

omkar
6 Min Read

टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई : नर्स, क्लार्क इ. पदांसाठी पदवी/उच्चपदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – नर्स ‘A’ (महिला),

पदसंख्या – २६ (ओपन ०१, | ईडब्ल्युएस १३, अज ८, अपंग ४)

पात्रता – उमेदवार जी.एन.एम आणि डिप्लोमा (ऑनकॉलॉजी नर्सिंग) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. किंवा उमेदवार बेसिक/पोस्ट बेसिक बी.एस्सी नर्सिंग उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक.,

वय – ३० वर्षे

 

२) पदाचे नाव – सायंटीफीक असिस्टंट ‘B’ (डिजीटल इमेजिंग फॅसीलीटी ॲण्ड बायोफिजिक्स),

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी पदवी (लाईफ सायन्स/ बायोकेमिस्ट्री/बायोफिजिन्स बायोटेक्नॉलॉजी / फिजिकल केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.,

वय – ३० वर्षे

 

३) पदाचे नाव – सायंटीफीक असिस्टंट ‘B’ (अनिमल सायन्सेस),

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बी.एस्सी (न्युक्लीअर मेडीसीन टेक्नॉलॉज़ी) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५० % गुणांनी बी.एस्सी आणि डिप्लोमा (मेडीकल रेडीओस्टोम टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार % गुणांनी बी.एस्सी (बायोलॉजीकल सायन्सेस) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव वर्षे आवश्यक.,

वय – ३०

 

४) पदाचे नाव – स्टेनोग्राफर,

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. लघुलेखनगती ८० शप्रमी आवश्यक. संगणकावर टायपिंग गती ४० शप्रमी आवश्यक.

वय – २७ वर्षे

 

५) पदाचे नाव – टेक्निशिअन ए (सीआरआय लॅब्स),

पदसंख्या – ओपन २,

पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वय – २७ वर्षे

 

६) पदाचे नाव – टेक्निशिअन ए (कार्पेंटर),

पदसंख्या – अजा १

पात्रता – उमेदवार १० वी आणि आयटीआय (कार्पेटर) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वय – २७ वर्षे

 

७) पदाचे नाव – टेक्निशिअन ए (फोटोग्राफी),

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार १२ वी आणि डिप्लोमा (कमरशीअल आर्टस) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.,

वय २७ वर्षे

 

८) पदाचे नाव – लोअर डिव्हीजन क्लार्क,

पदसंख्या – २ (ईडब्ल्युएस १, अज १, अपंग १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक,

वय २७ वर्षे

 

वयोमर्यादा – दि. ०७ मार्च २०२४ रोजी पद क्रं. १ ते ३ साठी ओपन उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत, असावे तर पद क्रं. ४ ते ८ साठी २७ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग व माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ ते ३ साठी ₹९३००३४८००/-+ ग्रेड पे ४२००/- पद क्रमांक ४ साठी ₹ ५२००२०२००/-+ ग्रेड पे २८००/- तर उर्वरीत सर्व पदांसाठी ₹ ५२००-२०२००/-+ ग्रेड पे १९००/- अशी वेतनश्रेणी अंदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इ. दि. ०७ मार्च २०२४ रोजीचे धरले

निवड पद्धत- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/स्कील टेस्ट/मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार स्कील टेस्ट/ मुलाखत घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन, वैद्यकीय चाचणी घेऊन आणि चारित्र्य पडताळणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांना ₹३००/- अशी परीक्षा फी ती असून नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/महिला/माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.actrec.gov.in या वेबसाईटवरून दि. ०७ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. उमेदवारांनी अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायीक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ५) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळेस ऑनलाईन अर्जाच्या’ प्रिंटाऊटसोबत परीक्षा फी ई-रिसीट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. शासकिय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच अर्जासोबत ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी निवडीच्यावेळी वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.actrec.gov.in ही वेबसाईट पहावी.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ०७ मार्च २०२४ सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *