टाटा मेमोरिअल सेंटर : असिस्टंट्स, क्लार्क इ. पदांसाठी १० वी/पदवी/उच्च पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०६ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – अँडमिनिस्ट्रेटीव्ह असिस्टंट,
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – प्रोजेक्ट सायंटीफिक ऑफीसर (सायन्स कम्युनिकेशन),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी एम.एस्सी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ६० % गुणांनी बीई/बीटेक उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नाव – प्रोजेक्ट क्लार्क,
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टायपिंग चे ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
४) पदाचे नाव – प्रोजेक्ट वर्क असिस्टंट (ऑक्सीलरी),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी उमेदवाराचे वय पद क्रमांक १ साठी ३३ वर्षांपर्यंत, पद क्रमांक २ साठी २८ वर्षांपर्यंत तर पद क्रमांक ३ व ४ साठी ४५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी रु६८,०५८/-, पद क्रमांक २ साठी रु७७,०००/-, पद क्रमांक ३ साठी रु३७,७००/- तर पद क्रमांक ४ साठी रु३०,१००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इ. दि. ०१ जानेवारी २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/स्कील टेस्ट/ मुलाखतीद्वारे केली जाईल. निवडीबाबत उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ईमेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन्स/बँक पासबुक इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://tmc.gov.in या वेबसाईटवरून दि. ०६ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. वयामध्ये सवलत घेत असलेल्या अपंग/माजी सैनिक उमेदवारांनी व सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी अर्जाची प्रिंटाऊट आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह खालील पत्यावर पोस्टाने पाठविणे आवश्यक. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Post applied for “ असे लिहिणे आवश्यक.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार क्रमांक (असल्यास) उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचे व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, फोटो असलेले ओळखपत्र, दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय / निमशासकिय/ विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व अर्जाच्या प्रिंटाऊसोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://tmc.gov.in ही वेबसाईट पहावी.
अर्जाची प्रिंटाऊट पाठविण्याचा पत्ता – Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400005
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०६ जुलै २०२४
अर्जाची प्रिंटाऊट स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ०६ जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *