state bank of india (sbi) sbi junior associate clerk (customer sales & support) recruitment 2024 | स्टेट बैंक १३७३५ क्लार्क्स, ज्युनिअर असोसिएट पदांसाठी भर्ती. - govtjobsu.com

state bank of india (sbi) sbi junior associate clerk (customer sales & support) recruitment 2024 | स्टेट बैंक १३७३५ क्लार्क्स, ज्युनिअर असोसिएट पदांसाठी भर्ती.

omkar
7 Min Read

state bank of india : १३७३५ क्लार्क (ज्युनिअर असोसिएट) पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ जानेवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँण्ड सेल्स)

एकूण पदसंख्या – १३७३५ (ओपन ५८७०, ईडब्ल्यूएस १३६१, ओबीसी ३००१, अजा २११८, अज १३८५) पैकी अपंग ५६९ (अस्थिव्यंग १३६, अल्पदृष्टी १५९, कर्णबधीर १४९, बहुविध अपंगत्व १२५), माजी सैनिक १३६१, अपंग माजी सैनिक ६००)

 

विभागानुसार पदविभागणी –

१) मुंबई मेट्रो / महाराष्ट्र – ११६३ (ओपन ५१६, ईडब्ल्यूएस ११५, ओबीसी ३१३, अजा ११५, अज १०४) पैकी अपंग ४८ (अस्थिव्यंग ११, अल्पदृष्टी १३, कर्णबधीर १३, बहुविध अपंगत्व ११), माजी सैनिक ११५, अपंग माजी सैनिक ५१)

२) गोवा/महाराष्ट्र – २० (ओपन १३, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ३, अज २) पैकी अपंग १ (अल्पदृष्टी १), माजी सैनिक २

३) बेंगलोर (कर्नाटक) – ५० (ओपन २१, ईडब्ल्यूएस ५, ओबीसी १३, अजा ८, अज ३) पैकी अपंग २ (अल्पदृष्टी १, कर्णबधीर १), माजी सैनिक ५, अपंग माजी सैनिक २)

 

इतर विभागातील पदभरतीसाठी उमेदवारांनी www.sbi.co.in ही वेबसाईट पहावी. तसेच एकुण पदसंख्ये सोबत मागील राहीलेले (बॅकलॉग) १२५४ पदे भरली जातील.

पात्रता – दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार ज्या विभागासाठी अर्ज करु इच्छितो त्या विभागाच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.)

माजी सैनिकांसाठी शैक्षणिक पात्रता – ज्या उमदेवारांची सैन्य दलामध्ये १५ वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे असे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र.

वयोमर्यादा – दि. ०१ एप्रिल २०२४ रोजी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ एप्रिल १९९६ ते ०१ एप्रिल २००४ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. विधवा/ घटस्फोटित किंवा कायदेशिररित्या विभक्त परंतू पुर्नविवाह न केलेल्या ओपन महिला उमेदवारांना ३५ वर्षांपर्यंत, ओबीसी ३८ वर्षांपर्यंत तर अजा/ अज महिला उमेदवारांना वयात ४० वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत मात्र त्यांचे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.२४०५०-६४४८०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना स्टेट बँकेच्या इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) महाराष्ट्र राज्यासाठी प्रादेशिक भाषा मराठी, गोवा राज्यासाठी कोकणी आणि कर्नाटक राज्यासाठी कन्नड आहे. २) उमेदवारांनी प्रादेशिक भाषा १० वी / १२ वीस अभ्यासलेली असणे आवश्यक. मात्र उमेदवारांनी जर प्रादेशिक भाषा १० वी / १२ वीस अभ्यासलेली नसेल, तर अशा उमेदवारांना प्रादेशिक भाषा चाचणी उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. ही चाचणी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर घेण्यात येईल. ३) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची १०० गुणांची आणि १ तास कालावधीची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यामध्ये इंग्रजी भाषा (३० प्रश्न, ३० गुण, कालावधी २० मिनिटे), अंकगणित (३५ प्रश्न, ३५ गुण, कालावधी २० मिनिटे), बुध्दिमत्ता (३५ प्रश्न, ३५ गुण, कालावधी २० मिनिटे) या विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. यामधील पात्र उमेदवारांची २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची आणि २ तास ४० मिनिटे कालावधीची मुख्य ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. यामध्ये जनरल / फायनान्शिअल अवेअरनेस (५० प्रश्न, ५० गुण, कालावधी ३५ मिनिटे), इंग्रजी भाषा (४० प्रश्न, ४० गुण, कालावधी ३५ मिनिटे), अंकगणित (५० प्रश्न, ५० गुण, कालावधी ४५ मिनिटे), आणि बुद्धीमत्ता व संगणकाचे ज्ञान (५० प्रश्न, ६० गुण, कालावधी ४५ मिनिटे) यावर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम स्थानिक भाषा (मराठी/कोकणी/कन्नड इ.), हिंदी आणि इंग्रजी असेल तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५% गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षेमधील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

पूर्व परीक्षा दिनांक – फेब्रुवारी २०२५

परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई / ठाणे / नवी मुंबई, रायगड, पालघर, सोलापूर, अमरावती, अकोला नागपूर, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, धुळे, जळगाव, लातूर, अहमदनगर ही परीक्षा केंद्रे असून इतर राज्यातील केंद्रांसाठी वेबसाईट पहावी.

प्रोबेशन कालावधी – ०६ महिने

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी दि. फेब्रुवारी २०२५ पासून परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / पासपोर्ट इ.) व त्याची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा पूर्व प्रशिक्षण – अजा/अज/माजी सैनिक आणि अल्पसंख्यांक उमेदवारांना परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध असून त्यासाठी ऑनलाईन अर्जात तसे नमूद करणे आवश्यक. उमेदवारांनी परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. उमेदवारांनी परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

परीक्षा फी – ओपन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.७५०/- अशी असून ती नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज /अपंग/माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.sbi.co.in या वेबसाईटवरून दि. १७ डिसेंबर २०२४ ते ०७ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फिकट बॅकराऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिकट बॅकराऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो व सही २) डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, विहित नमुन्यातील डिक्लरेशन ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ५) आधार कार्ड क्रमांक (असल्यास)

उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.sbi.co.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ०७ जानेवारी २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

 

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *