state bank of india : १६९ इंजिनिअर्स पदांसाठी इंजि. पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १२ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नांव – असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअर-सिव्हील)
पदसंख्या – ४२ (ओपन १९, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ११, अजा ६, अज ३) पैकी कर्णबधीर १, अस्थिव्यंग १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि पदवी (सिव्हील) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नांव – असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअर-इलेक्ट्रीकल)
पदसंख्या – २५ (ओपन १३, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ६, अजा ३, अज १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि पदवी (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नांव – असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअर-फायर)
पदसंख्या – १०१ (ओपन ४२, ईडब्ल्यूएस १०, ओबीसी २६, अजा १६, अज ७)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि पदवी (सेफ्टी अँण्ड फायर इंजि. /फायर टेक्नॉलॉजी अँण्ड सेफ्टी इंजि./फायर सेफ्टी) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दि. ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी पद क्रमांक १ व २ साठी २१ ते ३० वर्षांपर्यंत, पद क्रमांक ३ साठी २१ ते ४० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग (दिव्यांग) उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.४८४८०-८५९२०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराची पात्रता, वय, अनुभव इ. दि. ०१ ऑक्टोबर २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल, प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल, त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बह्पर्यायी स्वरुपाची १७० प्रश्न २२० गुणांची आणि १३५ मिनिटे कालावर्धीची असेल. यामध्ये बुद्धमत्ता (५० प्रश्न – ५० गुण), अंकगणित (३५ प्रश्न- ३५ गुण), इंग्रजी (३५ प्रश्न- ३५ गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (५० प्रश्न- १०০ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जाईल, लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल, लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक व वेळ ई-मेल द्वारे कळविण्यात येईल, उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घेणे आवश्यक, मुलाखतीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड /मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊून जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना रु. ७५०/- अशी परीक्षा फी असून ती नेटबंकिंग /क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्रारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/ अज/अपंग (दिव्यांग) उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक, यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्र्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक, उमेदवारांनी www.sbi.co.in या वेबसाईटवरून दि. १२ डिसेंबर २०२४ पर्थंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला), काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धरतीने परीक्षा पफी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रेंटाऊट प्राप्त होईल, अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटा (प्राधान्याने पांढरी बँकग्राऊंड असलेला) व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) आधार कार्ड ५) फोटो असलेले औओळखपत्र ६) वयाचा पूरावा ७) बायोडाटा ८) अर्पंग असल्यास तसा दाखला ९) जात प्रमाणपत्र १०) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ११) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम व अँसेट प्रमाणपत्र उमेदवारांनी मुलाखतीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच मुलाखतीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.sbi.co.in ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १२ डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *