स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) : ८३२६ मल्टी टास्किंग स्टाफ, हवालदार पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ३१ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल),
पदसंख्या – ४८८७
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
२) पदाचे नाव – हवालदार (सीबीआयसी – जीएसटी अँण्ड कस्टम, सीबीएन – सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटीक्स)
पदसंख्या – ३४३९ (ओपन १५५१, ईडब्ल्यूएस २९०, ओबीसी ७९२, अजा ५१६, अज २९०) पैकी माजी सैनिक २८७, अस्थिव्यंग ४८, कर्णबधीर ४८, बहुविध अपंगत्व ३७
विभागानुसार पदविभागणी –
सीजीएसटी – पुणे – ९ (ओपन ३. ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २)
सीजीएसटी – मुंबई – ३०४ (ओपन १०८, ईडब्ल्यूएस ३६, ओबीसी ८४, अजा ४६, अज ३०)
सीजीएसटी – गोवा – १३ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा १, अज १)
कस्टम्स – मुंबई – २३ (ओपन १६, ईडब्ल्यूएस १. ओबीसी ६) पैकी माजी सैनिक २
कस्टम्स – गोवा – १८ (ओपन ११, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, अज १) पैकी माजी सैनिक २
डायरोक्टरेट – डीजीपीएम – २६९ (ओपन १०१, ईडब्ल्यूएस २५, ओबीसी ७६, अजा ४८, अज १९ ) पैकी माजी सैनिक १, अस्थिव्यंग ३, कर्णबधीर ३, बहुविध अंपगत्व १
डायरोक्टरेट – सीबीएन – १८२ ( ओपन १३२, ईडब्ल्यूएस ७. ओबीसी १०, अजा १७, अज १६) पैकी माजी सैनिक १८, अस्थिव्यंग ३, कर्णबधीर ३
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
हवालदार पदासाठी शारीरिक पात्रता – पुरुष उमेदवार – उंची १५७.५ सेमी (अज उमेदवारांना उंची मध्ये ५ सेमी सवलत), छाती ७६ सेमी (५ सेमी फुगविता येणे आवश्यक), महिला उमेदवार – उंची १५२ सेमी (अज उमेदवारांना उंची मध्ये २.५ सेमी सवलत), वजन ४८ किग्रॅ
वयोमर्यादा – दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय एमटीएस (मधील काही पदे) आणि हवालदार सीबीएन साठी १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ ऑगस्ट १९९९ ते ०१ ऑगस्ट २००६ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा. तर उर्वरीत एमटीएस मधील पदे व हवालदार सीबीआयसी साठी १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ ऑगस्ट १९९७ ते ०१ ऑगस्ट २००६ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. सेवेदरम्यान अपंगत्व आलेल्या ओपन व ओबीसी सैनिकांना ३ वर्षे तर अजा/अज सैनिकांना वयात ८ वर्षे सवलत. विधवा / घटस्फोटित / कायदेशिररीत्या विभक्त परंतु पुनर्विवाह न केलेल्या ओपन/ ओबीसी महिला उमेदवारांना ३५ पर्यंत, तर अजा/अज महिला उमेदवारांना ४० वर्षांपर्यंत सवलत. ओपन/ओबीसी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ४० वर्षांपर्यंत तर अजा/अज कर्मचाऱ्यांना ४५ वर्षांपर्यंत सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५२००-२०२०० + ग्रेड पे रु. १८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारास केंद्र सरकारच्या सर्व त्या सोयी, सवलती, भत्ते प्रदान करण्यात येतील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता इ. दि. ३१ जुलै २०२४ रोजीची धरली जाईल. २) उमेदवाराने नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, आईचे नाव इ. दहावी प्रमाणपत्राप्रमाणेच लिहावे.
निवड पध्दत – उमेदवारांनी निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे आणि शारिरीक क्षमता चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने Tire-। परीक्षा घेण्यात येईल. Tire-। परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची २०० गुणांची व ९० मिनिटे कालावधीचा असेल. यामध्ये इंग्रजी (२५ प्रश्न – ७५ गुण), बुद्धिमत्ता (२० प्रश्न -६० गुण), अंकगणित (२० प्रश्न – ६० गुण) आणि सामान्यज्ञान (२५ प्रश्न – ७५ गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी इंग्रजी आणि स्थानिक भाषा असेल तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. Tire- । मध्ये ओपन उमेदवारांनी ३० %, ईडब्ल्यूएस / ओबीसी २५% तर उर्वरीत मागासवर्गीय उमेदवारांनी २० % गुण मिळविणे आवश्यक. त्यामधील पात्र उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणी घेतली जाईल, यामध्ये पुरुष उमेदवार चालणे – १६०० मीटर अंतर १५ मिनिटामध्ये पुर्ण करणे तर महिला उमेदवार चालणे – १ कीमी अंतर २० मिनिटामध्ये पुर्ण करणे या चाचण्या घेतल्या जातील. (एमटीएस पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार नाही) यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. सदर भरतीसाठी मुलाखती घेतल्या जात नाहीत. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, मुंबई,नागपूर, नाशिक, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, जळगाव ही परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्रास जवळची अशी पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा ही परीक्षा केंद्रे आहेत. इतर राज्यातील परीक्षा केंद्रांसाठी वेबसाईट पहावी.
Tire-। परीक्षा दिनांक – ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२४
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे २ फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹१०० अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग / क्रेडीट कार्ड / डेबीट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. याशिवाय उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरू शकतात, अर्जाचा पहिला भाग भरल्यांनतर परीक्षा फी चलन प्राप्त होईल. अजा/अज /अपंग/माजी सैनिक व महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक, यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://ssc.gov.in/ या वेबसाईटवरून दि. ३१ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी. व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा नमुद करणे आवश्यक) रंगीत फोटो व सही २) दहावीचे गुणपत्र/प्रमाणपत्र (१० वी रोल नं.) ३) आधारकार्ड ४) शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ५) जात प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) पदांचा प्राधान्य क्रम उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, नावात बदल असण्यास गॅझेट/विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विधवा/घटस्फोटीत महिला उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती तसेच रंगीत फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी निवडीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी https://ssc.gov.in/ ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ३१ जुलै २०२४,
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – ०१ ऑगस्ट २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *