स्टाफ सिलेक्शन कमिशन, CHSL : क्लार्क, पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट इ. पदांसाठी १२ वी उत्तीर्ण / १२ वीस बसलेल्या उमेदवारांकडून दि. ०८ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
परीक्षेचे नाव – कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेव्हल (१०+२) परीक्षा – २०२४
पदांची नावे – लोअर डिव्हिजन क्लार्क/ ज्युनिअर सेक्रेटरी असिस्टंट, पोस्टल असिस्टंट/ सॉटींग असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘ए’.
एकुण पदसंख्या – ३७१२
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेमधून १२ वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. (किंवा समतुल्य अर्हता धारक असावा) १२ वीस बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र, मात्र अशा उमेदवारांनी १२ वी गुणपत्र दि. ०१ ऑगस्ट २०२४ पूर्वी प्राप्त करणे आवश्यक.
• लोअर डिव्हिजन क्लार्क पदासाठी बॉडर्र रोड ऑर्गनायझेशन विभागासाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी
शारीरिक पात्रता – उंची १५७ सें.मी, वजन – किमान ५० – कि.ग्रॅ, छाती – न फुगवता – ७५ सें.मी, फूगवून – ८० सें.मी दृष्टी दोन्ही डोळे ६/१२ किंवा उजवा डोळा ६/६, डावा डोळा ६/२४ करेक्टेबल टू ६/६० असावा. शारीरिक क्षमता चाचणी – १ मैल धाव १० मिनिटांत पूर्ण करणे.
वयोमर्यादा – दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ ऑगस्ट १९९७ ते ०१ ऑगस्ट २००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिक उमेदवारांचे दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजीचे वय वजा सेवा कालावधी अधिक ३ वर्षे इतकी सवलत. ३ वर्षे शासकिय सेवा पूर्ण झालेल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना ४० पर्यंत तर अजा/अज उमेदवारांना वयात ४५ पर्यंत सवलत. विधवा/घटस्फोटीत/ कायदेशीररित्या विभक्त परंतू पुर्नविवाह न केलेल्या ओपन प्रवर्गातील महिला उमेदवारांना वयात ३५ पर्यंत तर अजा/अज महिला उमेदवारांना वयात ४० पर्यंत सवलत. युद्धात किंवा अशांत प्रदेश/ क्षेत्रातील कारवाईत अपंगत्व आलेल्या ओपन प्रवर्गातील सैनिकांना ३ वर्षे तर अजा/अज सैनिकांना वयात ८ वर्षे सवलत. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया ऑफिसमधील जनगणना कर्मचाऱ्यांना केलेली सेवा अधिक ३ वर्षे इतकी सवलत. आर्मीमध्ये क्लार्क पदावर काम करत असलेल्या ज्या सैनिकांची १ वर्षाची सेवा राहिलेली आहे, अशा ओपन सैनिकांना ४५ वर्षांपर्यंत तर अजा/अज सैनिकांना ५० वर्षांपर्यंत सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना लोअर डिव्हिजन क्लार्क/ ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट पदांसाठी ₹५२००-२०२०० + ग्रेड पे ₹ १९००, पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर/डाटा एन्ट्री ऑपरेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘ए’ पदासाठी ₹ ५२००-२०२०० + ग्रेड पे ₹२४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वय इ. दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजीची धरली जाईल.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड ऑनलाईन पूर्व परीक्षा, मुख्य लेखी परीक्षा आणि टायपिंग/ स्कील टेस्ट द्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने पूर्व परीक्षा (Tier-I) घेतली जाईल. पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची २०० गुणांची ६० मिनिटे कालावधीची असेल. यामध्ये बुद्धीमत्ता (२५ प्रश्न -५० गुण), इंग्रजी भाषा (२५ प्रश्न-५० गुण), अंकगणित (२५ प्रश्न -५० गुण) आणि सामान्यज्ञान (२५ प्रश्न -५० गुण) या विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण वजा केला जाईल. पूर्व परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुख्य लेखी परीक्षा (Tier-II) घेतली जाईल. मुख्य परीक्षे मध्ये २ विभाग असतील विभाग १ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचा, १३५ प्रश्नांचा आणि ४०५ गुणांचा आणि १ तास १५ मिनिटे कालावधीची असेल. यामध्ये अंकगणित (३० प्रश्न ९० गुण), बुद्धीमत्ता (३० प्रश्न ९० गुण), इंग्रजी भाषा (४० प्रश्न १२० गुण), सामान्य ज्ञान (२० प्रश्न ६० गुण), संगणकाचे ज्ञान (१५ प्रश्न ४५ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. मुख्य परीक्षेचे माध्यम इंग्रजी किंवा हिंदी असेल. यामध्ये पात्र होण्यासाठी किमान ३३ गुण मिळणे आवश्यक. तर विभाग २ मध्ये उमेदवारांची टायपिंग/ स्कील टेस्ट घेतली जाईल. टायपिंग/स्कील टेस्टचे पदांनुसार स्वरुप पुढीलप्रमाणे – डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी – यामध्ये उमेदवारांची कॉम्प्युटरवर डाटा एन्ट्री गती (ताशी ८००० की डिप्रेशन) तपासली जाईल. यासाठी उमेदवारांना एक उतारा १५ मिनिटात टाईप करण्यासाठी दिला जाईल. लोअर डिव्हिजन क्लार्क/ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट आणि पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट पदांसाठी – उमेदवारांची टायपिंग गती इंग्रजी ३५ श.प्र.मि किंवा हिंदी ३० श.प्र.मि असणे आवश्यक. यासाठी उमेदवारांनी १० मिनिटांमध्ये दिलेला उतारा टाईप करणे अशा स्वरुपाची टायपिंग टेस्ट घेण्यात येईल. टायपिंग टेस्टचे माध्यम उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद करणे आवश्यक. स्कील/ टायपिंग टेस्टमधील पात्र उमेदवारांची पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. फक्त बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशन विभागासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक पात्रता व शारीरिक क्षमता चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा दिनांक – पूर्व परीक्षा (Tier-I) – जून- जुलै २०२४
परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रामधील कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, जळगाव, नांदेड ही परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्रास जवळची अशी पणजी इ. परीक्षा केंद्रे आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात ३ परीक्षा केंद्रांचा प्राधान्यक्रम नमूद करणे आवश्यक.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावीत. प्रवेशपत्राबाबत उमेदवारांना ई-मेल /SMS द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत २ पासपोर्ट आकाराचे फोटो (अर्ज भरताना अपलोड केल्याप्रमाणे) तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) पैकी एक प्रमाणपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन/ओबीसी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹ १००/- अशी असून नेटबँकिंग /क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. उमेदवार स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरू शकतात. महिला / अजा/अज /अपंग/माजी सैनिक उमेदवारांसाठी परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी ssc.gov.in या वेबसाईटवरून दि. ०७ मे २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो फोटो (अलिकडील काळात काढलेला (३ महिन्याच्या आतिल) व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी • अकाळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षाफीभरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो (अलिकडील काळात काढलेला (३ महिन्याच्या आतिल)) व सही २) दहावीचे गुणपत्र / प्रमाणपत्र ३) आधारकार्ड ४) जात प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्रे तपासणी वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी उत्पन्न व मालमत्तेचा दाखला, अल्पसंख्याक असल्यास तसे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास गॅझेट इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी ssc.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दि. ०७ मे २०२४,
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – दि. ०८ मे २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *