दक्षिण-पूर्व रेल्वे : खेळाडू भरतीसाठी १० वी/आय.टी.आय/ १२ वी/पदवी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दिनांक १९ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
एकूण पदसंख्या – ३३.
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी
१) बॉडी बिल्डींग (पुरुष) : ६५ किग्रॅ – १
२) क्रिकेट (पुरुष) : बॅट्समन (ओपनर)/ बॅट्समन (मिडल ऑर्डर)/ स्पिनर ऑल राऊंडर/पेसर ऑल राऊंडर/पेस बॉलर/लेफ्ट आर्म स्पिनर – ६ (प्रत्येकी १)
३) फूटबॉल (पुरुष) : गोल किपर / स्टॉपर / विंगर / फॉरवर्ड – ४ (प्रत्येकी १)
४) गोल्फ (पुरुष) : इंडीव्हीज्युअल – १
५) जिमनेस्टीक्स (महिला) : आर्टीस्टीक्स – २
६) हॉकी (पुरुष) : डिफेंडर / फॉरवर्ड – २ ( प्रत्येकी १)
७) हॉकी (महिला) : डिफेंडर -२/फॉरवर्ड-३/गोलकिपर – १- ६
८) कब्बडी (महिला) : राईट कव्हर/लेफ्ट कॉर्नर-ऑल राऊंडर – २ (प्रत्येकी १)
९) हॉली बॉल (महिला) : कौंटर अटॅकर/सेटर- १/ लिबेरो/ युनिव्हर्सल – २ – ३
१०) हॉली बॉल (पुरुष) : सेंटर ब्लॉकर/कौंटर अटॅकर/सेटर- ३ (प्रत्येकी १)
११) वॉटर पोलो (पुरुष) : लाईन २/ गोल किपर – १ – ३
वेतनश्रेणीनुसार पदसंख्या – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/२०००
एकूण पदसंख्या – १६.
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी
१) अँथलेटीक्स (पुरुष) : ३००० मी. स्टीपल चेस / १०० मी. हर्डल्स १/५००० मी. धावणे / १०० मी. / २०० मी.- १/ डीस्क थ्रो / ४०० मी./ ८०० मी.- १/ हॅमर थ्रो /१५०० मी.-१/ लाँग जम्प/पोल हॉल्ट / शॉट पूट – १ – ५
२) बॉक्सींग (पुरुष) : ४८ किग्रॅ / ५४ किग्रॅ – १/६३.५ किग्रॅ /८० शि/ ९२ किग्रॅ – २
३) बॉडी बिल्डींग (पुरुष) : ८५ किग्रॅ / १००-१०० + किग्रॅ २ (प्रत्येकी १).
४) चेस (पुरुष) : इंडीव्हीज्युअल – २
५) रायफल शुटींग (महिला) : ५० मी. रायफल प्रोन – १
६) स्विमिंग (पुरुष) : ५०/१००/२००/४००/८००/१५०० फ्रि स्टाईल – १
७) पॉवर लिफ्टींग (पुरुष) : ७४ किग्रॅ – १
८) पॉवर लिफ्टींग (महिला) : ८४ + – १
९) हॉली बॉल (महिला) : सेंटर ब्लॉकर – १
वेतनश्रेणीनुसार शैक्षणिक पात्रता आणि क्रिडा पात्रता – रु.५२००-२०२०० ग्रेड रु.रु.१८००
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/२००
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा. टक्केवारीची अट नाही. किंवा १० वी आणि संबंधीत ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
क्रिडा पात्रता – वर्ल्डकप (ज्युनिअर / सिनिअर), वर्ल्ड चैम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर), एशियन गेम्स (सिनिअर) किंवा कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा कॉमन वेल्थ चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर / सिनिअर)/एशियन चॅम्पियनशीप / एशियन कप (ज्युनिअर / सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर ) / USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर) मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त झालेले असावे. किंवा सिनिअर / युथ / ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान पटकाविलेले असावे किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करुन किमान ३ रे स्थान पटकावलेले असावे किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पीयनशीपमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान पटकाविलेले असावे किंवा फेडरेशन कप सिनिअर गटात राज्यस्तरावर प्रथम स्थान पटकाविलेले असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते २५ या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म २ जानेवारी २००० ते ०१ जानेवारी २००७ दरम्यान झालेला असावा.
सर्व पदांसाठी समान अटी – १) उमेदवारांची क्रिडा पात्रता ०१ एप्रिल २०२० नंतरची धरण्यात येईल. २) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. ३) क्लार्क कम टायपिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी इंग्रजी टायपिंग गती ३० श.प्र.मि आणि हिंदी टायपिंग गती २५ श.प्र.मि. प्रमाणपत्र ४ वर्षांच्या आत सादर करणे आवश्यक. ४) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी व भत्ते प्रदान केले जातील.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड एकूण १०० गुणांची असून त्यांमध्ये खेळाचे कौशल्य, शारीरीक तंदुरुस्ती, प्रशिक्षक चाचण्या यावर ४० गुण (यामध्ये किमान २५ गुण मिळविणे आवश्यक), संबंधीत क्रिडा पात्रता ५० गुण तसेच शैक्षणिक पात्रता १० गुण या गुणांवर आधारीत निवड केली जाईल. वेतनश्रेणी ५२००-२०२०० + ग्रेड पे १९०० / २००० साठी किमान ६५ गुण तर ५२००-२०२०० + ग्रेड पे १८०० साठी किमान ६० गुण मिळविणे आवश्यक, यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. निवडीच्यावेळी उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या २-२ स्व:साक्षांकित प्रती तसेच मुळ प्रतींसह उपस्थित राहणे आवश्यक. येताना स्वतःचे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक पात्र उमेदवारांनाच कॉल लेटर्स पाठविले जातील. परीक्षेच्या ठिकाणी २-३ दिवस राहण्याची व्यवस्था उमेदवारास स्वतःच करावी लागेल. तसेच परीक्षेसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक. अजा/ अज उमेदवारांना नियमानुसार प्रवासखर्च दिला जाईल.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. निवडीच्यावेळेस सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांना परीक्षा फी रु.५००/ – तर अल्पसंख्याक / आर्थिकदृष्ट्या मागास / अजा/अज / माजी सैनिक/अपंग/महिला उमेदवारांना परीक्षा फी रु.२५०/- अशी ‘FA & CAO, South Eastern असून ती Railway,Garden Reach 700043’ यांच्या नावे पेयेबल रु.ट ‘GPO/Kolkata’ अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डीडी/ पोस्टल ऑर्डर स्वरूपात अर्जासोबत जोडावी.
महत्वाची सुचना – निवडीसाठी उपस्थित राहणाऱ्या ओपन / ओबीसी उमेदवारांना रु.४००/- तर अजा/अज / महिला / मा.सैनिक / अल्पसंख्याक /अपंग / आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना रु.२५०/- परीक्षा फी त्यांच्या बँक खात्यावर परत करण्यात येईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) परीक्षा फी डी. डी / पोस्टल ऑर्डर २) क्रिडा प्रमाणपत्रे ३) वयाचा पुरावा ४) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ५) जात प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांनी उत्पन्नाचा दाखला ७) अल्पसंख्यांक उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) अपंग असल्यास तसा दाखला १०) अर्जावर दिलेल्या ठिकाणी सध्याच्या काळातील पांढरी बॅकग्राऊंड असलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा. असाच आणखी एक पाठीमागे नाव, जन्मदिनांक व सही केलेला फोटो अर्जासोबत जोडावा. उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात व मुळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application against Sports Quota (Open Advertisement) recruitment for the year 2024-25”. LEVEL-1 or LEVEL-2/3 are ferfiut असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठावावेत व अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.ser.indianrailways.gov.in ही वेबसाईट पहावी,
अर्ज करण्याचा पत्ता – The Chairman, Railway Recruitment Cell, New Administrative Building, 6th Floor, Garden Reach, Kolkata-700043
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक – १९ ऑगस्ट २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *