सिडबी ५० असिस्टंट मॅनेजर्स पदवी भर्ती | SIDBI 50 Assistant Managers Degree Bharti
सीडबी (स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) : ५० असिस्टंट मॅनेजर्स पदांसाठी पदवी/उच्च पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर ग्रेड – A,
पदसंख्या – ५० (ओपन २३, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी १४, अजा ६, अज ४) पैकी अपंग ३ (कर्णबधीर १, बहुविध अपंगत्व २)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज अपंग ५५ % गुणांनी) कायदा पदवी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज अपंग ५५ % गुणांनी) कोणत्याही शाखेची इंजि पदवी उत्तीर्ण असावा. (सिव्हील/इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल इंजि पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.) किंवा उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज अपंग ५५ % गुणांनी) कोणत्याही शाखेची उच्च पदवी उत्तीर्ण असावा (कॉमर्स / इकॉनॉमिक्स / मॅनेजमेंट विषयामधून उच्चपदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य) किंवा उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज अपंग ५५ % गुणांनी) सीए/सीएस/ सीडब्युए/सीएफए परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म ०१ नोव्हेंबर १९९४ ते ०९ नोव्हेंबर २००३ दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियामप्रमाणे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना उच्चतम वयोमर्यादेची अट लागू नाही.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.२८१५०-५५६००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव दि. ०८ नोव्हेंबर २०२४ रोजीची धरली जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड पूर्व ऑनलाईन परीक्षा, मुख्य ऑनलाईन आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची, २०० गुणांचा आणि १२० मिनिटे कालावधीचा असेल यामध्ये इंग्रजी भाषा (३० प्रश्न, ३० गुण), सामान्य ज्ञान (२० प्रश्न, २० गुण), बुद्धीमत्ता (२५ प्रश्न, २५ गुण), अंकगणित (२५ प्रश्न, २५ गुण), एमएसएमई पॉलीसी, रेग्युलेटरी अँण्ड लिगल फ्रेमवर्क (३० प्रश्न, ३० गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (५० प्रश्न, ५० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील यामधील पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची, ७५ गुणांचा आणि ७५ मिनिटे कालावधीचा असेल यामध्ये निबंधलेखन आणि पत्र लेखन यावर आधारी प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
ऑनलाईन परीक्षा दिनांक – २२ डिसेंबर २०२४
प्रोबेशन कालावधी – १ वर्ष,
परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई/नवी मुंबई/ ठाणे/छत्रपती संभाजी नगर/अमरावती/नांदेड/नाशिक/नागपूर ही परीक्षा केंद्रे असून इतर राज्यामधील परीक्षा केंद्रांसाठी वेबसाईट पहावी.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल / एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.११०० /- तर अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.१७५ /- अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.sidbi.in या वेबसाईटवरून दि. ०२ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी केवळ एकाच पदासाठी अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने र पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व विहित नमुन्यातील स्वहस्ताक्षरामध्ये लिहिलेले डिक्लरेशन (काळ्या शाईच्या पेनेन लिहिलेले) स्कॅन करुन अपलोड करावे व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो, सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा २) विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरामध्ये लिहिले डिक्लरेशन (काळ्या शाईच्या पेनने लिहलेले) ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र ५) आधार क्रमांक
उमेदवारांनी निवडीच्याच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.sidbi.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०२ डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *