sameer : Assistants, Technicians job vacancy - govtjobsu.com

sameer : Assistants, Technicians job vacancy

omkar
5 Min Read

sameer : Assistants, Technicians vacancy आयटीआय/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २५ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. 

 

१) पदाचे नाव –  रिसर्च सायंटीस्ट (RSEL001)

पदसंख्या – २१

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक/एमई/एमटेक (इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन इंजि./इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी एम.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – प्रोजेक्ट असिस्टंट – A (PAEL002 – A)

पदसंख्या – १०

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स इंजि./इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन इंजि./ इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा.

 

३) पदाचे नाव – प्रोजेक्ट असिस्टंट – B (PAEL003 – B)

पदसंख्या – ०१

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स इंजि./इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन इंजि./इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

४) पदाचे नाव –  प्रोजेक्ट टेक्निशिअन – A (PTEL004)

पदसंख्या – ०४

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा.

 

५) पदाचे नाव – प्रोजेक्ट टेक्निशिअन – A (PTME005)

पदसंख्या – ०४ (फिटर ०२, मशिनिस्ट ०२)

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी आयटीआय (फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा.

 

६) पदाचे नाव – प्रोजेक्ट मॅनेजमेंट असिस्टंट – B (PMA006B)

पदसंख्या – ०२

पात्रता – उमेदवार बीए/बी.एस्सी/बी.कॉम/बीबीए/बीएमएस उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा – दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय पद क्रमांक १ व ६ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्रमांक ३ साठी ३५ वर्षांपर्यंत तर उर्वरीत सर्व पदांसाठी २५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना उच्चतम वयोमर्यादेची अट लागू नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी रु.३०,०००/द.म., पद क्रमांक २ साठी रु.१७,०००/- द.म., पद क्रमांक ३ व ६ साठी रु.२०,०००/- द.म. तर पद क्रमांक ४ व ५ साठी रु.१५,१००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय इ. दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्कील टेस्ट/ ” मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट/मुलाखत घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येइल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकि प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://sameer.gov.in/ या वेबसाईटवरून दि. २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकाच पदासाठी अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो, काळा शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र ४) असल्यास आधारकार्ड उमेदवारांनी निवडीच्याच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, नावात बदल असल्यास गॅझेट इ. प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी https://sameer.gov.in/ ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचा व परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – २५ ऑगस्ट २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *