सैनिक स्कुल मिझोराम शिक्षक भरती | Sainik School Mizoram Teacher Recruitment
Sainik School Mizoram : शिक्षक पदासाठी पदवी/उच्चपदवी+बी.एड उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ट्रेन्ड ग्रॅज्युएट टिचर (गणित),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी पदवी (गणित) आणि बी.एड किंवा डी.एड उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ५० % बी.एस्सी.एड (गणित) उत्तीर्ण असावा. तसेच सी.टी.ई.टी/टी.ई.टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक. उच्चपदवी / एनसीसी प्रमाणपत्र / क्रीडा प्राविण्य/इतर गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
२) पदाचे नाव – ट्रेन्ड ग्रॅज्युएट टिचर (इंग्रजी),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी पदवी (इंग्रजी) आणि बी.एड – किंवा डी.एड उत्तीर्ण असावा तसेच सी.टी.ई.टी/टी.ई.टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक. उच्चपदवी / एनसीसी प्रमाणपत्र/ क्रीडा प्राविण्य/इतर गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
३) पदाचे नाव – ट्रेन्ड ग्रॅज्युएट टिचर (जनरल सायन्स),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी पदवी (फिजिक्स/बॉटनी/झूलॉजी/ केमिस्ट्री) आणि बी.एड किंवा डी.एड उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ५० % बी.एस्सी.एड (गणित) उत्तीर्ण असावा. तसेच सी.टी.ई.टी / टी.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक. उच्चपदवी / एनसीसी प्रमाणपत्र/ क्रीडा प्राविण्य / इतर गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
४) पदाचे नाव – ट्रेन्ड ग्रॅज्युएट टिचर (कॉम्प्युटर सायन्स),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नाव – मेट्रन (महिला),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – ०५ डिसेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय पद क्रमांक १ ते ४ साठी २१ ते ३५ तर पद क्रमांक ५ साठी १८ ते ५० वर्षांपर्यंत असावे.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ ते ४ साठी रु.४०,०००/ – तर पद क्रमांक ५ साठी रु.२२,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) अजा/अज उमेदवार उपलब्ध न झाल्यास ओपन उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
निवड पद्धत – उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. मुलाखतीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन व ओबसी उमेदवारांसाठी रु.३००/- तर अजा/ अज उमेदवारांसाठी रु.१००/- अशी परीक्षा फी असून ती PRINCIPAL, SAINIK SCHOOL CHHINGSHHIP यांच्या नावे PAYABALE AT STATE BANK OF INDIA, ELECTRIC VENG BRANG, AIZAWL, BRANCH CODE -16361, IFSC CODE SBIN0016361 अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डी.डी. स्वरुपात अर्जासोबत जोडावी.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) डी.डी २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ५) ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ७) फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) ८) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. असेच आणखी दोन फोटो अर्जासोबत जोडावेत.
उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच स्वत:चा पत्ता लिहिलेला व रु.४२ चे पोस्टाचे तिकीट लावलेला ९ X ४ इंच आकाराचा एक लिफाफा जोडावा. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF_____________ “ असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठावावेत व अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळेस वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Principal, Sainik School Chhingchhip, Chhingchhip, Dist-Serchhip, Pin – 796161
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ०५ डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *