सैनिक स्कूल छत्तीसगड : वॉर्ड बॉय, कौन्सलर, असिस्टंट इ. पदांसाठी १० वी / १२ वी / पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २९ जून २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – मेडीकल ऑफीसर
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार एमबीबीएस उत्तीर्ण असावा.
वय – १८ ते ५० वर्षे
मानधन – ७५,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
२) पदाचे नाव – कौन्सलर
पदसंख्या – अजा १
पात्रता – उमेदवार पदवी (सायकोलॉजी) उत्तीर्ण असावा किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (चाईल्ड डेव्हलपमेंट/करीअर गायडन्स) उत्तीर्ण असावा.
वय – २१ ते ४० वर्षे
मानधन – ४०,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
३) पदाचे नाव – बॅण्ड मास्टर/म्युजिक टीचर
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. वाद्यचालविण्याचे ज्ञान आवश्यक.
वय – १८ ते ३५ वर्षे
मानधन – २५,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
४) पदाचे नाव – हॉर्स रायडिंग इन्स्ट्रक्टर
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. हॉर्स रायडींग/रीसालदार कोर्स प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.
वय – १८ ते ५० वर्षे
मानधन – २५,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
५) पदाचे नाव – पीटीआय कम मेट्रन
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. डिप्लोमा/पदवी (फिजिकल एज्युकेशन) उत्तीर्ण असावा.
वय – १८ ते ५० वर्षे
मानधन – २५,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
६) पदाचे नाव – लॅबोरेटरी असिस्टंट
पदसंख्या – अजा १
पात्रता – उमेदवार १२ वी (बायोलॉजी विषयासह विज्ञान) उत्तीर्ण असावा.
वय – २१ ते ३५ वर्षे
मानधन – २०,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
७) पदाचे नाव – लॅबोरेटरी असिस्टंट
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १२ वी (केमिस्ट्री विषयासह विज्ञान) उत्तीर्ण असावा.
वय – २१ ते ३५ वर्षे
मानधन – २०,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
८) पदाचे नाव – वॉर्ड बॉय
पदसंख्या – ४ (ओपन २, अजा १, अज १)
पात्रता – उमेदवार इंग्रजी विषयासह १२ वी उत्तीर्ण असावा.
वय – १८ ते ५० वर्षे
मानधन – १७,०००/- द.म. असे अदा केले जाईल.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक २९ जून २०२४ रोजीचे धरले जाईल. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे तर अजा उमेदवारांना ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. लेखी परीक्षेमध्ये बुद्धीमत्ता (२५ प्रश्न, २५ गुण), अंकगणित (२५ प्रश्न,२५ गुण), इंग्रजी भाषा (२५ प्रश्न,२५ गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न,२५ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. प्रवेशपत्रा सोबत मूळ प्रमाणपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त रजिस्टर/स्पिड़ पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) अनुभव असल्यास तसा दाखला ४) जातीचे प्रमाणपत्र ५) ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) रहिवासी दाखला ७) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकीत केलेला फोटो चिकटवावा. असेच आणखी ३ फोटो अर्जासोबत जोडावेत. उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात व मुळ प्रती कागदपत्रे तपासणी वेळी सादर कराव्यात. तसेच अर्जासोबत स्वत:चा पत्ता लिहिलेला २५ X १० सेमी आकाराचा योग्य त्या किंमतीचे पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा जोडणे आवश्यक ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF ______________ and CAT-EGORY ____________ “ असे लिहावे. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचारी/महामंडळातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत व ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अर्जासोबत जोडावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal, Sainik School Dist-Surguja, Ambikapur, Mendra Kalan, Chhattisgarh-497001
अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – २९ जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *