Chemical company Mumbai
राष्ट्रीय केमिकल्स : १६५ अप्रांटिस ट्रेनी पदांसाठी १२ वी/डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १९ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ट्रेड अप्राटिस,
एकूण पदसंख्या – ८०
ट्रेडनुसार पदविभागणी आणि पात्रता
• अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट – ६३,
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी (अजा/अज/अपंग ४५ % गुणांनी) बी. एस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा मात्र पदवीस फिजिक्स आणि मॅथेमेटिक्स किंवा बायोलॉजी हे विषय अभ्यासलेले असणे आवश्यक.
वय – २५ वर्षांपर्यंत,
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
• लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट – ०८,
पात्रता – उमेदवार ५०% गुणांनी (अजा/अज / अपंग ४५% गुणांनी) बी. एस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा मात्र पदवीस फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी हे विषय अभ्यासलेले असणे आवश्यक.
वय – २५ वर्षांपर्यंत,
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
• इन्स्ट्रमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट – ०१,
पात्रता – उमेदवार ५०% गुणांनी (अजा/अज/अपंग ४५% गुणांनी) बी. एस्सी (फिजिक्स) उत्तीर्ण असावा मात्र पदवीस केमिस्ट्री विषय अभ्यासलेला असणे आवश्यक.
वय – २५ वर्षांपर्यंत,
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
• इलेक्ट्रीशियन – ३,
पात्रता – उमेदवार ५०% गुणांनी (अजा/अज/अपंग ४५ % गुणांनी) १२ वी (विज्ञान-गणित विषयासह) उत्तीर्ण असावा.
वय – २१ वर्षांपर्यंत,
प्रशिक्षण कालावधी – २ वर्ष
• हॉर्टिकल्चर असिस्टंट – ५,
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी (अजा/अज/अपंग ४५ % गुणांनी १२ वी उत्तीर्ण असावा.
वय – २५ वर्षांपर्यंत,
प्रशिक्षण कालावधी – २ वर्ष
२) पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रोटिस,
एकूण पदसंख्या – ३१
ट्रेडनुसार पदविभागणी आणि पात्रता
• सेक्रेटरिअल असिस्टंट – ३१
पात्रता – उमेदवार ५०% गुणांनी (अजा/अज/अपंग ४५ % गुणांनी) १२ वी उत्तीर्ण असावा. कोणत्याही शाखेची पदवी/ डिप्लोमा (एक्झीक्युटीव्ह पर्सनल असिस्टंट) उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
वय – २५ वर्षांपर्यंत,
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष ३ महिने
३) पदाचे नाव – डिप्लोमा ट्रेनी,
एकूण पदसंख्या – ५४
शाखेनुसार पदविभागणी
पदविभागणी – केमिकल इंजि १४, मेकॅनिकल इंजि. १८, इलेक्ट्रीकल इंजि. १०, इन्स्टुमेंटेशन इंजि. १०, कॉम्प्युटर इंजि. २
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी (अजा/अज/अपंग ४५% गुणांनी) संबंधित विषयामधून डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
वय – २५ वर्षांपर्यंत,
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जुलै २०२४ रोजीचे धरले जाईल. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत.
विद्यावेतन – १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना रु.७०००/टेक्निशिअन अप्रांटीस/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना रु.८०००/- तर ग्रॅज्युएट अप्रांटीस/पदवी उत्तीर्ण उमेदवारांना रु.९०००/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहीत धरावा. २) आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ओबीसी/अजा/अज/अपंग उमेदवारांना शासनाच्या नियमाप्रमाणे पदसंख्येमध्ये आरक्षण लागू राहील. ३) यापूर्वी अप्रांटिस ट्रेनींग पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र ४) डिप्लोमा ट्रेनी पदांसाठी शैक्षणिक पात्रता मागील ३ शैक्षणिक वर्षामध्ये प्राप्त केलेले उमेदवाराच अर्ज करण्यास पात्र.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामधील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत एसएमएस / ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. निवडीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. प्रथम उमेदवारांनी टेक्निशिअन अप्रांटीस साठी nats.education.gov.in या वेबसाईट वरून तर उर्वरीत पदांसाठी apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी त्यानंतर उमेदवारांनी www.rcfltd.com या वेबसाईटवरुन दि. १९ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) पॅन कार्ड ३) अप्रांटिस पोर्टलवर नोंदणी क्रमांक उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्मक अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, बँक खाते पासबुक (आधार जोडलेले), वैद्यकिय प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी वेळोवेळी www.rcfltd.com ही वेबसाईट पहावी.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १९ जुलै २०२४ सायंकाळी ५०० वाजेपर्यंत
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *