रेल्वे सुरक्षा (RPF) ४२०८ कॉन्स्टेबल २०२४ - govtjobsu.com

रेल्वे सुरक्षा (RPF) ४२०८ कॉन्स्टेबल २०२४

omkar
8 Min Read

रेल्वे सुरक्षा दल (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स : ४२०८ कॉन्स्टेबल पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १४ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (एक्झीक्युटिव्ह)

एकूण पदसंख्या – ४२०८ पैकी माजी सैनिक ४२०

पुरुष – ३५०० (ओपन १४५०, ईडब्ल्यूएस ३५०, ओबीसी ९६६, अजा ५३६, अज २६८)

महिला – ६३१ (ओपन २५६, ईडब्ल्यूएस ६३, ओबीसी १७०, अजा ९५, अज ४७)

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा टक्केवारीची अट नाही.

शारीरिक पात्रता – 

● पुरुष उमेदवारांसाठी – उंची – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी १६५ सें.मी, अजा/अज उमेदवारांसाठी – १६० सें.मी, मराठा उमेदवारांसाठी – १६३ सें.मी, छाती – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी – ८० सें.मी, अजा/अज उमेदवारांसाठी ७६.२ से.मी., मराठा उमेदवारांसाठी ८० सें.मी. छाती किमान ५ से.मी फुगणे आवश्यक.

● महिला उमेदवारांसाठी – उंची – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी १५७ से.मी. अजा / अज उमेदवारांसाठी – अजा/अज १५२ सें.मी, मराठा उमेदवारांसाठी – १५५ सें.मी.

 

वयोमर्यादा – दि. १ जुलै २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय – १८ ते २८ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज ३ उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. म्हणजेच ओबीसी उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै १९९३ ते ०१ जुलै २००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा तर अजा/अज उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै १९९१ ते ०१ जुलै २००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान या दरम्यान झालेला असावा), विधवा/ घटस्फोटीत/ कायदेशिररित्या विभक्त परंतू पुर्नविवाह न केलेल्या ओपन महिला उमेदवारांना २ वर्षे, ओबीसी ५ वर्षे, तर अजा/ अज महिलांना वयात ७ वर्षे सवलत. ओपन प्रवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना ५ वर्षे, ओबीसी ८ वर्षे तर अजा/अज कर्मचाऱ्यांना वयात १० वर्षे सवलत, माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹ ५२००-२०२०० + ग्रेड पे ₹ २०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना रेल्वेच्या सर्व त्या सोयी, सवलती, भत्ते प्रदान करण्यात येतील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) प्रत्येक ग्रुपमधील १०% पदे माजी सैनिकांसाठी राखीव ३) अपंग उमेदवारांनी अर्ज करू नयेत. ४) दहावीस बसलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नयेत.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकिय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १२० गुणांची व ९० मिनिटे कालावधी असेल. यामध्ये सामान्यज्ञान (५० गुण), अंकगणित (३५ गुण) आणि बुद्धिमत्ता (३५ गुण) यावर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा स्तर दहावीसमान असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण वजा केले जातील. परीक्षेचे माध्यम मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू इ. असून उमेदवारांनी यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करावे. ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ओपन व ओबीसी उमेदवारांनी किमान ३५ % तर अजा/अज उमेदवारांनी किमान ३० % गुण मिळविणे आवश्यक. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धाव ५.१७०, मिनिट ४५ सेकंदामध्ये पूर्ण करणे, १४ फूट लांब उडी (२ संधी) आणि ४ फूट उंच उडी (२ संधी) अशा चाचण्या तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धाव ३ मिनिट ४० सेकंदामध्ये पूर्ण करणे, ९ फूट लांब उडी (२ संधी) आणि ३ फूट उंच उडी (२ संधी) अशा चाचण्या घेण्यात येतील. माजी सैनिक उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार नाही. शारीरिक क्षमता चाचणीमधील पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. ऑनलाईन परीक्षेसाठी येणाऱ्या अजा/अज उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.

 प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्र परीक्षेच्या १० दिवस आधी वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.

 परीक्षा फी – ओपन आणि ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹ ५००/- तर अजा / अज / महिला / मा.सैनिक/ अल्पसंख्याक / आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना परीक्षा फी ₹२५०/- अशी असून ती नेटबँकिंग/ क्रेडिट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेस बसतील अशा उमेदवारांची परीक्षा फी संबंधित बँक खात्यावर रेल्वे बोर्डाकडून परत जमा होईल.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. www.indianrailways.gov.in किंवा उमेदवारांनी https:// www.rrbapply.gov.in/ या वेबसाईटवरून दि. १४ मे २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी केवळ एकाच ग्रुप साठी अर्ज करावा व त्या ग्रुप अंतर्गत येणाऱ्या रेल्वे युनिट्ससाठी प्राधान्यक्रम द्यावा. उमेदवारांनी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. पांढरी बॅकराऊंड असलेला फोटा व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वतः जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत / पोस्ट ऑफिसमध्ये रोखीने परीक्षा फी भरावी परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो (फोटोवर उमेदवाराचे नाव फोटो काढल्याचा दिनांक असावा.) २) दहावीचे प्रमाणपत्र ३) इतर सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) अजा/अज उमेदवारांनी जात प्रमाणपत्र ५) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ६) आधार क्रमांक (असल्यास) ७) बँक खात्याचा तपशील

              उमेदवारांनी कागदपत्रे तपासणी वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा की ई रिसिट, सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांनी उत्पनाचा दाखला, अल्पसंख्याक असल्यास तसे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास गॅझेट इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रतींचे दोन संच व ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे १२ फोटो सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.indianrailways.gov.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा कालावधी – १५ एप्रिल २०२४ ते १४ मे २०२४

 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – १४ मे २०२४ (रात्री ११.५९ पर्यंत)

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

सूचना – १) सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या स्वसाक्षांकित आणि मूळ प्रति निवडीच्यावेळी सादर कराव्यात. २) उमेदवारांना अर्जामध्ये जास्तीत जास्त २ वेळा दुरुस्ती करता येईल, मात्र त्यासाठी प्रत्येक वेळी रु.२५० /- दुरुस्ती फी भरावी लागेल.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *