रेल कोच फॅक्टरी, चेन्नई : १०१० अप्रांटिस ट्रेनी पदांसाठी १० वी आणि आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २१ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – अप्रांटिस ट्रेनी,
एकुण पदसंख्या – १०१०
शाखेनुसार पदविभागणी –
१) एक्स आयटीआय
एकुण पदसंख्या – ६८० (ओपन ३११, ओबीसी १८६, अजा १०४, अज ५३) पैकी अपंग २६
ट्रेडनुसार पदविभागणी –
• फिटर – १८० (ओपन ८३, ओबीसी ४९, अजा २७, अज १४) पैकी अपंग ७
• वेल्डर – १८० (ओपन ८३, ओबीसी ४९, अजा २७, अज १४) पैकी अपंग ७
• इलेक्ट्रीशिअन – १६० (ओपन ७५, ओबीसी ४३, अजा २४. अज १२) पैकी अपंग ६
• कार्पेटर – ५० (ओपन २२, ओबीसी १४, अजा ८, अज ४) पैकी अपंग २
• मशिनिस्ट – ५० (ओपन २२, ओबीसी १४, अजा ८, अ ४) पैकी अपंग २
• पेंटर – ५० (ओपन २२, ओबीसी १४, अजा ८, अज ४) पैकी अपंग २
• पासा – १० (ओपन ४, ओबीसी ३, अजा २, अज १)
पात्रता – सर्व पदांसाठी उमेदवार ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा. तसेच संबंधित ट्रेडमधुन ITI उत्तीर्ण आणि NTC प्रमाणपत्रधारक असावा.
२) फ्रेश आयटीआय
एकुण पदसंख्या – ३३० (ओपन १५२, ओबीसी ९०, अजा ५०, अज २४) पैकी अपंग १४
ट्रेडनुसार पदविभागणी –
१) फिटर – ८० (ओपन ३७, ओबीसी २२, अजा १२, अज ६) पैकी अपंग ३
२) इलेक्ट्रीशिअन – ४० (ओपन १८, ओबीसी ११, अजा ६. अज ३) पैकी अपंग २
३) मशिनिस्ट – ४० (ओपन १८, ओबीसी ११, अजा ६, अज ३) पैकी अपंग २
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी विज्ञान आणि गणित विषयासह १० वी उत्तीर्ण असावा.
४) कार्पेटर – ४० ( ओपन १८, ओबीसी ११, अजा ६, अज ३) पैकी अपंग २
५) पेंटर – ४० (ओपन १८, ओबीसी ११, अजा ६, अज ३) पैकी अपंग २
६) वेल्डर – ८० (ओपन ३७, ओबीसी २२, अजा १२, अज ६) पैकी अपंग ३
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी १० वी उत्तीर्ण असावा.
७) एमएलटी – रेडीओलॉजी -५ (ओपन ३, ओबीसी १, अजा १)
८) एमएलटी – पॅथोलॉजी – ५ (ओपन ३, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयासह १२ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. २१ जून २०२४ रोजी आयटीआय उत्तीर्ण ओपन उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षापर्यंत तर नॉन आयटीआय उत्तीर्ण ओपन उमेदवाराचे वय १५ ते २२ वर्षापर्यंत पदांसाठी असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत, अपंग/माजी सैनिक उमेदवारांनां वयात १० वर्षापर्यंत सवलत.
विद्यावेतन – उमेदवारांना आयटीआय उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना रु. ७०००/- द.म. तर उर्वरीत उमेदवारांना रु. ७०००/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रता दि. २१ जून २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये (१० वी व आयटीआय) मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. उमेदवारांची आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹ १०० अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक, याशिवाय उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरू शकतात. अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://pb.icf.gov.in या वेबसाईट वरून दि. २१ जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर दोन दिवसांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) वयाचा दाखला ५) जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसा दाखला ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी https://pb.icf.gov.in ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. २१ जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *