पॉवरग्रीड कॉर्पोरेशन : एक्झीक्युटीव्ह ट्रेनी (फायनान्स) पदांसाठी सीए/आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – एक्झीक्युटीव्ह ट्रेनी (फायनान्स),
पदसंख्या – ३६ (ओपन १६, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ८, अजा ६, अज ३) पैकी अपंग २ (अल्पदृष्ट्री १, कर्णबधीर १)
पात्रता – उमेदवार सीए/आयसीडब्ल्युए (सीएमए) परीक्षा उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – एक्झीक्युटीव्ह ट्रेनी (कंपनी सेर्केटीरी),
पदसंख्या – ३ (ओपन २, अज १)
पात्रता – उमेदवार सीएस परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग / उमेदवारांना वयात १५ वर्षापर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. तर माजी सैनिकांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना उच्चतम वयोमर्यादेची अट लागू नाही.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५०,०००-२% – १,६०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल यामध्ये २ विभाग असतील. विभाग १ मध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारीत १२० प्रश्न विचारले जातील. तर विभाग २ मध्ये व्होकॅबलरी, व्हर्बल कॉम्प्रेहेशन, अंक गणित, बुध्दीमत्ता, डाटा सफिशिएन्सी आणि इंटरप्रिटेशन यावर आधारीत ५० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण असेल. तर चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी किमान ४० % (ओबीसी / अजा/अज/अपंग/माजी सैनिक ३० %) गुण मिळविणे आवश्यक. तसेच प्रत्येक विभागामध्ये किमान ३० % (ओबीसी / अजा/अज /अपंग/माजी सैनिक २५%) गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमध्ये उमेदवारांनी किमान ४० % (ओबीसी/ अजा/अज/अपंग/माजी सैनिक ३० %) गुण मिळविणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तायादीनुसार कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल.
परीक्षा केंद्रे – मुंबई, हैद्राबाद, बेंगलोर, वडोदरा, चेन्नई, दिल्ली, कोलकत्ता
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.५००/- अशी असून नेट बँकींग/क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/विभागीय कर्मचारी / माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.powergridindia.com या वेबसाईटवरुन दि. ०७ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिटांऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) जातीचा दाखला ४) वयाचा दाखाला ५) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई-रिसीट, वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत. तसेच निवडीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.powergridindia.com ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०७ ऑगस्ट २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *