पिंपरी चिंचवड मनपाः १५० फायरमन्स २०२४ - govtjobsu.com

पिंपरी चिंचवड मनपाः १५० फायरमन्स २०२४

omkar
6 Min Read

पिंपरी चिंचवड मनपा : १५० फायरमन्स पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १७ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर

पदसंख्या – १५० (ओपन ४३ पैकी महिला १३, माजी सैनिक ६, प्रग्रस्त २, भूग्रस्त १, खेळाडू २, इतर १९, एसईबीसी १५ पैकी महिला ५, माजी सैनिक २, प्रग्रस्त १, खेळाडू १, इतर ६, ईडब्ल्यूएस १५ पैकी महिला ५, माजी सैनिक २, प्रग्रस्त १, खेळाडू १, इतर ६, ओबीसी २९ पैकी महिला ९, माजी सैनिक ४. प्रग्रस्त १, भूग्रस्त १, खेळाडू १, इतर १३, अजा २० पैकी महिला ६, माजी सैनिक ३. प्रग्रस्त १, खेळाडू १, इतर ९, अज १० पैकी महिला ३, माजीसैनिक २, प्रग्रस्त १, खेळाडू १, इतर ३, विजाअ ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २,भजब ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २, भजक ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २, भजड ३ पैकी महिला १, इतर २, विमाप्र ३ पैकी महिला १, इतर २) पैकी होमगार्ड ८, अनाथ २

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

शारिरिक पात्रता – पुरुष उमेदवार – उंची १६५ सेमी, वजन ५० किग्रॅ, छाती न फुगवता महिला उमेदवार – ८१ सेमी, फूगवून ८६ सेमी, उंची १६२ सेमी, वजन ५० किग्रॅ.

वयोमर्यादा – दिनांक १७ मे २०२४ रोजी ओपन उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीयांना ३ वर्षे, प्रग्रस्त, खेळाडू उमेदवारांना ४३ वर्षांपर्यंत, माजीसैनिकांना ४५ वर्षापर्यंत सवलत.

वेतनश्रेणी – ₹१९,९००-६३,२००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक १७ मे २०२४ रोजीचे धरले जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड शारिरिक मोजमाप चाचणी, शारिरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये पुरुष उमेदवार – १६०० मीधावणे (३० गुण), जमिनीपासून ३३ फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे (२० गुण), ५० किग्रॅ वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवुन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मिटर अंतर धावणे. (२० गुण), २० फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे (२० गुण), पुल-अप्स २० (१० गुण) तर महिला उमेदवार – ८०० मी धावणे (३० गुण), जमिनीपासून ३३ फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या अॅल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे (२० गुण), ४० किग्रॅ वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवुन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मिटर अंतर धावणे. (२० गुण), गोळा फेक (१० गुण), लांबउडी (१० गुण), पुश अप १० (१० गुण) यावर आधारीत चाचण्या घेतल्या जातील. त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची आणि २ तास कालावधीची घेतली जाईल. यामध्ये मराठी (१५ गुण), इंग्रजी (१५ गुण), सामान्य ज्ञान (१५ गुण), बौद्धीक चाचणी (१५ गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (४० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेची प्रवेशपत्रे वेबसाईटवरून डाऊनलोड करून परीक्षेच्या वेळेस सादर करणे आवश्यक. तसेच प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसेन्स) सोबत घेऊन परीक्षेपूर्वी १ तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक.

प्रोबेशन कालावधी – २ वर्षे

परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹१०००/- तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹९००/- अशी असून ती क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंगद्वारे भरणे आवश्यक. माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही. 

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https:// www.pcmcindia.gov.in/ या वेबसाईटवरुन दि. १७ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी एकाच पदासाठी अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती स्कॅन करुन अपलोड कराव्यात व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत: जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे (१० वी सह) ३) वयाचा दाखला ४) जातीचे प्रमाणपत्र ५) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) ८) आधारकार्ड (असल्यास) उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र’ इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सादर कराव्यात. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी उमेदवारांनी वेळोवेळी https:// www.pcmcindia.gov.in/ ही वेबसाईट पहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. १७ मे २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *