ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा : अप्रांटीस ट्रेनी पदांकरीता इंजि डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक १३ जुलै २०२४ पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रांटीस ट्रेनी (इंजिनिअर्स)
पदसंख्या – २ (ओपन २)
शाखेनुसार पदविभागणी –
• पदाचे नाव – केमिकल इंजि. – १
• पदाचे नाव – मेकॅनिकल इंजि. – १
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधुन इंजि पदवी उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रांटीस ट्रेनी (जनरल स्ट्रीम)
पदसंख्या – ४०
शाखेनुसार पदविभागणी –
• पदाचे नाव – आर्टस् – १२ (ओपन ५, ओबीसी ३, अजा २, अज २) पैकी अल्पदृष्टी १
• पदाचे नाव – कॉमर्स – ४ (ओपन ३, ओबीसी १)
• पदाचे नाव – बी.एस्सी – २० (ओपन ११, ओबीसी ५, अजा २, अज २)
• पदाचे नाव – बीसीए – २ (ओपन १, ओबीसी १)
• पदाचे नाव – पदवी (हॉटेल मॅनेजमेंट) – ओपन २
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधुन पदवी उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – टेक्निशिअन ॲप्रांटीस
पदसंख्या – ७
शाखेनुसार पदविभागणी –
• पदाचे नाव – केमिकल – ओपन २
• पदाचे नाव – इलेक्ट्रीकल – ओपन २
• पदाचे नाव – इलेक्ट्रॉनिक्स – ओपन १
• पदाचे नाव – मेकॅनिकल मेकॅनिकल – ओपन २
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधुन इंजि डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
विद्यावेतन – उमेदवारांना गॅज्युएट अप्रांटीस पदांसाठी रु ९०००/ द.म. तर डिप्लोमा अप्रांटीस पदांसाठी रु ८०००/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) यापूर्वी अप्रांटीस पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय चाचणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि अर्जासोबत जोडलेल्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती आणि फोटो असलेले ओळख पत्र (पॅनकार्ड/आधारकार्ड/ पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचे प्रमाणपत्र ४) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ५) आधारकार्ड ६) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application for the post of_______ “ असे लिहिणे आवश्यक. तसेच उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकीत प्रती व पोलीस व्हेरीफिकेशन प्रमाणपत्र आणि चारित्र्याचा दाखला निवडीच्या वेळी सादर करावा.
अर्ज करण्याचा पत्ता – THE CHIEF GENERAL MANAGER ORDNANCE FACTORY BHANDARA, (UNIT OF MUNITIONS INDIA LTD), BHANDARA441906 (MAHARASHTRA)
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – १३ जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *