( Nuclear Power )
न्यूक्लिअर पॉवर : एक्झीक्युटीव्ह ट्रेनीज् पदांकरीता इंजि पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक २६ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – इंडस्ट्रीअल ॲण्ड फायर सेफ्टी
पदसंख्या – १० (ओपन ४, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बीई/बीटेक/बी.एस्सी (इंजिनिअरींग) (इंडस्ट्रील ॲण्ड फायर सेफ्टी/हेल्थ सेफ्टी ॲण्ड एनव्हॉयर्नमेंट/फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनिअरींग/सेफ्टी ॲण्ड फायर इंजि./इंडस्ट्रीअल सेफ्टी फायर/फायर ॲन्ड इंडस्ट्रीअल सेफ्टी/ इंडस्ट्रीअल ॲण्ड फायर सेफ्टी/इंडस्ट्रीअल ॲण्ड फायर सेफ्टी इंजि./फायर ॲण्ड इंडस्ट्रीअल सेफ्टी इंजि./इंडस्ट्रीअल सेफ्टी इंजि. ॲण्ड फायर/इंडस्ट्रीअल सेफ्टी इंजि./फायर टेक्नॉलॉजी ॲण्ड सेफ्टी) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. २६ मार्च २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते २६ वर्षापर्यंत तर उर्वरीत वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग (दिव्यांग) १० वर्षे, ओबीसी अपंग (दिव्यांग) १३ वर्षे तर अजा/अज अपंग (दिव्यांग) उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. विधवा/घटोस्फोटित/ कायदेशीररित्या विभक्त परंतू पुर्नविवाह न केलेल्या ओपन महिलांना ३५ वर्षांपर्यंत तर अजा/अज महिलांना ४० वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. न्यूक्लिअर पॉवर येथील कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१५६००-३९१०० + ५४०० अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे वय, पात्रता इ. दि. २६ मार्च २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्न, ३०० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातील. त्यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ प्रवेशपत्राद्वारे कळविले जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांना परीक्षा फी ₹५००/-अशी परीक्षा फी असून ती नेटबँकींग, क्रेडीट कार्ड, डेबीटकार्ड द्वारे करणे आवश्यक. अजा/अज /अपंग/ महिला/विभागीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा. तसेच उमेदवाराकडे गेट परीक्षेच्या ॲडमिट कार्डवरील रजिस्ट्रेशन नंबर असणे आवश्यक. उमेदवारांनी www.npcilcareers.co.in या वेबसाईटवरून दि. २६ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. ऑनलाईन अर्जामध्ये आवश्यक माहिती भरावी त्यानंतर अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही स्कॅन करुन ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करावी. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. त्यानंतर अर्ज काळजीपुर्वक वाचुन सबमीट करावा. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे प्रमाणपत्रे ३) गेट स्कोअर कार्ड ४) जातीचे प्रमाणपत्र ५) माजी सैनिक असल्यास तसे प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र मात्र निवडीच्यावेळी उमेदवारांनी अर्जाच्या प्रिंटआऊट सोबत, परीक्षा फी ई-रिसीट, शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे, गेट स्कोअर कार्ड, वय, वयात सवलत घेत असाल तर तसा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र, अपंग असाल तर तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ प्रती व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रतींसोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावे आणि कागदपत्रे तपासणी वेळी ना- हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.npcilcareers.co.in ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दि. २६ मार्च २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *