न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन ३०० ट्रेनीज भर्ती | Nuclear Power Corporation 300 Trainees Recruitment
Nuclear Power Corporation, हैद्राबाद : ३०० अप्रांटिस ट्रेनीज् पदांकरीता आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – अप्रांटिस ट्रेनी
एकूण पदसंख्या – ३००
ट्रेड नुसार पदविभागणी –
१) पदाचे नाव – फिटर,
पदसंख्या – ९५
२) पदाचे नाव – टर्नर,
पदसंख्या – २२
३) पदाचे नाव – इलेक्ट्रीशियन,
पदसंख्या – ३०
४) पदाचे नाव – मशिनिस्ट,
पदसंख्या – १७
५) पदाचे नाव – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट),
पदसंख्या – ०७
६) पदाचे नाव – इंस्ट्रूमेंट मेकॅनिक,
पदसंख्या – ११
७) पदाचे नाव – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,
पदसंख्या – १८
८) पदाचे नाव – लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट),
पदसंख्या – १०
९) पदाचे नाव – मेकॅनिकल मोटर वेहिकल,
पदसंख्या – ३
१०) पदाचे नाव – ड्राफ्टसमन (मेकॅनिकल),
पदसंख्या – ०२
११) पदाचे नाव – कॉम्प्युटर ऑपरेटर अँण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट,
पदसंख्या – ४७
१२) पदाचे नाव – डिझेल मेकॅनिक,
पदसंख्या – ०४
१३) पदाचे नाव – कार्पेटर,
पदसंख्या – ०४
१४) पदाचे नाव – प्लंबर,
पदसंख्या – ०४
१५) पदाचे नाव – वेल्डर,
पदसंख्या – २४
१६) पदाचे नाव – स्टेनोग्राफर (इंग्रजी),
पदसंख्या – ०२
पात्रता – उमेदवार संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता – उंची- किमान १३७ सें.मी., वजन- किमान २५.४ किग्रॅ, छाती- किमान ३.८ सेमी फूगवीता येणे आवश्यक. दृष्टी- सामान्य
वयोमर्यादा – दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे तर अपंग उमेदवारांना १० वर्षे सवलत.
विद्यावेतन – एक वर्ष कालावधीचा आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांना रु.७,७००/- द.म., तर दोन वर्ष कालावधीचा आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांना रु.८,८५५/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २)यापूर्वी अप्रांटीस पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल. निवड यादीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल.
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वरुन नोंदणी करावी आणि एस्टॅब्लीशमेंट सर्च मधून न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड साठी दि. २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यवसायीक गुणपत्रके व प्रमाणपत्रे ३) अप्रांटीस नोंदणी क्रमांक ४) आधारकार्ड ५) जातीचे प्रमाणपत्र
उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, पोलिस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत. उमेदवारांनी वेळोवेळी www.npcilcareers.co.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – २५ नोव्हेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *