न्यूक्लिअर पॉवर : ५८ असिस्टंट्स २०२४ - govtjobsu.com

न्यूक्लिअर पॉवर : ५८ असिस्टंट्स २०२४

omkar
5 Min Read

न्यूक्लिअर पॉवर कार्पो. लि., मुंबई : ५८ असिस्टंट्स पदांकरीता पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक २५ जून २०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – असिस्टंट ग्रेड १ (एचआर),

पदसंख्या – २९ (ओपन १३, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ९, अजा २, अज ३),

पात्रता – उमेदवार ५० % गुणांसह पदवी (आर्टस / कॉमर्स / सायन्स) उत्तीर्ण असावा. संगणकावर टायपिंग गती इंग्रजी ३० शप्रमी आवश्यक.

 

२) पदाचे नाव – असिस्टंट ग्रेड १ (एफ ॲण्ड ए),

पदसंख्या – १७ (ओपन ८, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ५, अजा २, अज १)

पात्रता – उमेदवार ५० % गुणांसह बी.कॉम उत्तीर्ण असावा. संगणकावर टायपिंग गती इंग्रजी ३० शप्रमी आवश्यक.

 

३) पदाचे नाव – असिस्टंट ग्रेड १ (सी ॲण्ड एमएम),

पदसंख्या – १२ (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ४, अजा १, अज १)

पात्रता – उमेदवार ५० % गुणांसह पदवी (कॉमर्स/सायन्स (फिजिक्स/केमिस्ट्री/गणित विषयासह) उत्तीर्ण असावा. संगणकावर टायपिंग गती इंग्रजी ३० शप्रमी आवश्यक.

 

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹५२००-२०२००/- + ग्रेड पे २४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

वयोमर्यादा – दि. २५ जून २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २१ ते २८ वर्षापर्यंत असावे. ओबीसींना ३ वर्षे, अजा/अज उमेदवारांना ५ वर्षे, ओपन अपंगांना १० वर्षे, ओबीसी अपंगांना १३ वर्षे, अजा अपंगांना १५ वर्षापर्यंत वयात सवलत. माजीसैनिकांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक २५ जून २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १५० गुणांची व ६० मिनिटे कालावधीची पूर्व लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये सामान्यज्ञान (२५ प्रश्न), संगणक (१५ प्रश्न) आणि इंग्रजी (१० प्रश्न) यावर विषयांवर आधारित व २ तास प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी ३ गुण असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. पूर्व लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ओपन उमेदवारांनी ४० % तर ओबीसी/अजा/अज/अपंग उमेदवारांनी किमान ३० % गुण मिळविणे आवश्यक. पूर्व लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची, १५० गुणांची कालावधीची मुख्य लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये बुद्धिमत्ता (२५ प्रश्न) आणि अंकगणित (२५ प्रश्न) या विषयांवर अधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी ३ गुण असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. मुख्य लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ओपन उमेदवारांनी ३० % तर ओबीसी/अजा/अज/अपंग उमेदवारांनी किमान २० % गुण मिळविणे आवश्यक. मुख्य लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेण्यात येईल. स्कील टेस्टमधील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाइट वरून डाऊनलोड करून घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच साक्षांकित प्रती व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पासपोर्ट/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांना रु. १००/- अशी असून ती नेट बँकींग / क्रेडीट कार्ड / डेबीट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. महिला/ अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.npcilcarees.co.in या वेबसाईटवरुन दिनांक २५ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, अपंग असल्यास तसा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या प्रती व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी वेळोवेळी www.npcilcarees.co.in ही वेबसाईट पहावी. 

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – २५ जून २०२४ सायंकाळी ०५. वाजेपर्यंत

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *