Northern Railway Player Recruitment 12th | नॉर्थर्न रेल्वे खेळाडू भरती १२ वी - govtjobsu.com

Northern Railway Player Recruitment 12th | नॉर्थर्न रेल्वे खेळाडू भरती १२ वी

omkar
6 Min Read

नॉर्थर्न रेल्वे खेळाडू भरती १२ वी | Northern Railway Player Recruitment 12th

Northern Railway Player Recruitment ITI/ १२ वी / पदवी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दिनांक ११ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

* वेतनश्रेणी, क्रिडा प्रकार व पदविभागणी – 

पदसंख्या – २१

खेळानुसार पदविभगाणी –

१) फुटबॉल – पुरुष (डिफेंडर) – २,

२) वेटलिफ्टींग – पुरुष (८१ किग्रॅ) – १,

३) हॉलीबॉल (पुरुष) (लिबेरो, हिटर) – २ (प्रत्येकी १),

४) हॉकी (महिला) (फॉरवर्ड) – १,

५) क्रिकेट (पुरुष) (फॉरवर्ड) – १,

६) अँथलेटीक्स (महिला) (५००० मी.) – १,

७) अँथलेटीक्स (पुरुष) (हॅमर थ्रो, १५०० मी., पोल हॉल्ट) – ३ (प्रत्येकी १),

८) टेबल टेनिस (पुरुष) (सिंगल्स) – २,

९) जिमनेस्टीक्स (पुरुष) (ऑलराऊंडर) – १,

१०) बॉक्सींग (महिला) (५७ किग्रॅ, ६६ किग्रॅ) – २ (प्रत्येकी १)

११) हॅण्डबॉल (महिला) (ऑलराऊंडर) – १,

१२) बास्केट बॉल (महिला) (फॉरवर्ड, सेंटर) – २ (प्रत्येकी १)

१३) खो-खो (पुरुष) (ऑलराऊंड) – २,

 

वेतनश्रेणीनुसार शैक्षणिक पात्रता आणि क्रिडा पात्रता –

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे १९/२०००

पात्रता – उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.

क्रिडा पात्रता – वर्ल्डकप (ज्युनिअर / सिनिअर), वर्ल्ड चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर), एशियन गेम्स (सिनिअर) किंवा कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा कॉमन वेल्थ चॅम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर)/ एशियन चॅम्पियनशीप / एशिया कप (ज्युनिअर/ सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर) /USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर) मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे. किंवा सिनिअर / युथ / ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पीयनशीपमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा फेडरेशन कप सिनिअर गटात प्रथम स्थान प्राप्त केलेले असावे.

 

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००/२८००

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

क्रिडा पात्रता – ऑलंपिक गेम (सिनिअर कॅटेगरी) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा वर्ल्ड कप (ज्युनिअर / सिनिअर ) / वर्ल्ड चॅम्पियनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/ एशियन गेम्स (सिनिअर)/ कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे.

 

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ या दरम्यान असावे.

टीप – उमेदवारांची क्रिडा पात्रता दि. १ एप्रिल २०२२ नंतरची धरली जाईल.

सर्व पदांसाठी समान अटी – १) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील. २) क्लार्क पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग गती २५ श.प्र.मि प्रमाणपत्र निवड झाल्यापासून ४ वर्षांच्या आत सादर करणे आवश्यक. ३) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड संबंधीत क्रिडा चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची क्रिडा चाचणी घेण्यात येईल. क्रिडा चाचणीमधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी स्वत: चे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक. निवडीच्या ठिकाणी ३-५ दिवस राहण्याची व्यवस्था उमेदवारास स्वतःच करावी लागेल. तसेच परीक्षेसाठी उमेदवारांनी स्व:खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक.

प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती, २ फोटो तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन आणि ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.५००/- तर अजा/अज/महिला/ माजी सैनिक/अल्पसंख्याक/ आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना परीक्षा फी रु. २५०/- अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबीटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. या साठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.rrcnr.org या वेबसाईटवरून दिनांक ११ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) खेळाडू प्रमाणपत्रे ४) वयाचा पुरावा ५) जात प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) अल्पसंख्यांक असल्यास तसे प्रमाणपत्र ७) आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांनी उत्पनाचा दाखला ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.rrcnr.org ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ११ डिसेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *