नॉर्थन रेल्वे : खेळाडू भरती : १० वी २०२४ - govtjobsu.com

नॉर्थन रेल्वे : खेळाडू भरती : १० वी २०२४

omkar
7 Min Read

नॉर्थन रेल्वे : खेळाडू भरतीसाठी १० वी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दि. १६ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

एकूण पदसंख्या – ३८

खेळांनुसार पदविभागणी –

• फुटबॉल – (पुरुष) – ५ (सेंटर फॉरवर्ड / सेंटर हाफ / स्टॉपर / लेफ्ट आऊट / स्ट्रायकर/ फॉरवर्ड)

• वेट लिफ्टींग (पुरुष) – २ (१०२ किग्रॅ / १०९+ किन्नों)

• ॲथलेटीक्स (महिला) – २ (४०० मी)

• ॲथलेटीक्स (पुरुष) – ६ (५००० मी. २/१०००० मी. – २/ ४०० मी १/८०० मी. – १)

• बॉक्सींग (पुरुष) – ३ (९२ किग्रॅ / ४८-५१ किग्रॅ / ५७-६० किग्रॅ)

• बॉक्सींग (महिला) – १ (५७-६० किग्रॅ)

• स्विमिंग (पुरुष) – ३ (१०० मी. फ्रि स्टाईल २/१०० मी. बॅक स्ट्रोक)

• टेबल टेनिस (पुरुष) – २ सिंगल्स

• हॉकी (पुरुष) – ४ (फॉरवर्ड २, मिड फिल्डर २)

• हॉकी (महिला) – १ (सेंटर हाफ)

• बॅडमिंटन (पुरुष) – ४ (सिंगल्स)

• कब्बडी (महिला) – १ (राईट कॉर्नर)

• कब्बडी (पुरुष) – १ ( रायडर )

• रेसलिंग (पुरुष) – १ (९७ किग्रॅ फ्रि स्टाईल)

• रेसलिंग (महिला) – १ (५० किग्रॅ)

• चेस (पुरुष) – १

 

शैक्षणिक पात्रता आणि क्रिडा पात्रता –

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

क्रिडा पात्रता – वर्ल्डकप (ज्युनिअर/युथ/सिनिअर), वर्ल्ड चॅम्पियनशिप (ज्युनिअर/ सिनिअर), एशियन गेम्स (सिनिअर) किंवा कॉमन वेल्थ (सिनिअर)/युथ ऑलंपिक्स /ऊबर कप (बॅडमिंटन) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा कॉमन वेल्थ चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/एशियन चॅम्पियनशिप / एशिया कप (ज्युनिअर/ सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर) / USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशिप ( सिनिअर ) / वर्ल्ड युनिव्हसिटी गेम्स मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त झालेले असावे. किंवा सिनिअर / युथ / ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा ऑलिम्पिक असोशिएशनद्वारा आयोजित राष्ट्रीय खेळांमध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पीयनशिपमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा फेडरेशन कप चॅम्पियनशिप सिनिअर गटात प्रथम स्थान प्राप्त केलेले असावे.

टीप – उमेदवारांची क्रिडा पात्रता दि. १ एप्रिल २०२० नंतरची धरली जाईल.

वयोमर्यादा – दि. ०१ जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००४ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹५२००-२०२०० ग्रेड पे ₹१८००/ वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते – प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड क्रिडा प्रात्यक्षिक चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची ४० गुणांची क्रिडा प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येईल. यामध्ये किमान २५ गुण मिळविणे आवश्यक. क्रिडा चाचणीमधील पात्र उमेदवारांची क्रिडा प्रात्यक्षिक चाचणी (४० गुण), क्रिडा पात्रता (५० गुण), शैक्षणिक पात्रता (१० गुण) इ. मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यामध्ये उमेदवारांनी किमान ६५ गुण मिळविणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन आणि कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी स्वतःचे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. निवडीच्या ठिकाणी २-३ दिवस राहण्याची व्यवस्था उमेदवारास स्वतःच करावी लागेल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. निवडीसाठी येणाऱ्या अजा/अज उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती, २ फोटो तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांना परीक्षा फी ₹५००/- तर अल्पसंख्याक /आर्थिकदृष्ट्या मागास /अजा/अज / माजी सैनिक/महिला उमेदवारांना परीक्षा फी ₹२५०/- अशी असून ती नेटबँकींग/क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड द्वारे भरणे आवश्यक.

महत्वाची सुचना – निवडीसाठी उपस्थित राहणाऱ्या ओपन / ओबीसी उमेदवारांना १४००/- तर अजा / अज / महिला / मा. सैनिक / अल्पसंख्याक / आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना ₹ २५०/- परीक्षा फी त्यांच्या बँक खात्यावर परत करण्यात येईल.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी https://rrcnr.net.in/ या वेबसाईटवरुन दि. १६ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करणेपूर्वी उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी असणे आवश्यक. नसेल तर नवीन वैध ईमेल आयडी प्राप्त करावा. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन अर्जामध्ये स्वतःचा तपशील भरावा तसेच फोटो व सही तसेच आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती स्कॅन करुन अपलोड कराव्यात व अर्ज काळजीपूर्वक वाचुन सबमिट करावा. त्यानंतर नेटबँकींग / क्रेडीटकार्ड/डेबीट कार्ड द्वारे परीक्षा फी भरावी. प्राप्त होणारा रजि. नंबर लिहून ठेवावा. त्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे गुणपत्रे ३) जातीचे प्रमाणपत्र ४) खेळाचे प्रमाणपत्र ५) आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक ६) मा.सैनिक/ अल्पसंख्याक / आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास तसे प्रमाणपत्र ७) बँक पासबुक

उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट व प्रवेशपत्र, फोटो असलेले ओळखपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्व-साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. तसेच २ पासपोर्ट आकाराचे फोटो (फोटोच्या पाठीमागे सही करावी) सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय- निमशासकीय मंडळामधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत. तसेच निवडीच्या वेळेस ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी https:// rrcnr.net.in/ ही वेबसाईट पाहावी.

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा – अंतिम दिनांक – १६ मे २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

सूचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या साक्षांकित केलेल्या व मूळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *