north east frontier railway : खेळाडू भरतीसाठी ITI / १० वी / पदवी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दिनांक १० डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
* वेतनश्रेणी, क्रिडा प्रकार व पदविभागणी –
* वेतनश्रेणी – रु.५२०० – २०२०० ग्रेड पे रु.२४००/२८००
पदसंख्या – ५
खेळानुसार पदविभागणी –
१) वेटलिफ्टींग (महिला) – ९६ किग्रॅ – १,
२) बॉक्सींग (पुरुष) – ५६-६० किग्रॅ – १
३) बॉक्सींग (महिला) – ४९ – ५२ किग्रॅ – १
४) सायकलींग – ट्रॅक इव्हेंट – १
५) गोल्फ – सिंगल १
वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/ २०००,
पदसंख्या – १६
खेळानुसार पदविभागणी –
१) अँथलेटीक्स (पुरुष) – जॅव्हलीन थ्रो – १,
२) आर्चरी (महिला) – कपौंड – १,
३) बास्केटबॉल (पुरुष) – ऑलराऊंडर – ३,
४) बास्केटबॉल (महिला) – ऑलराऊंडर – १,
५) बॉक्सींग (महिला) – ६९-७५ किग्रॅ / ८१ + किग्रॅ – २,
६) क्रिकेट (पुरुष) – पेस बॉलर/मिडल ऑर्डर बॅट्समन – २,
७) क्रिकेट (महिला) – बॅट्समन – १,
८) सायकलींग (पुरुष) – रोड ईव्हेंट (इंडीव्हीज्युअल टाईम ट्रायल) – १,
९) टेबल टेनिस (पुरुष) – सिंगल – १,
१०) हॉलीबॉल (पुरुष) – अटॅकर/युनिव्हर्सल – २,
११) वेटलिफ्टींग (पुरुष) – ७३ किग्रॅ – १, शैक्षणिक पात्रता आणि क्रिडा पात्रता
वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००/२८००
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
क्रिडा पात्रता – ऑलंपिक गेम (सिनिअर कॅटेगरी) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा वर्ल्ड कप (ज्युनिअर/ सिनिअर)/वर्ल्ड चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/ एशियन गेम्स (सिनिअर)/ कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे.
वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००
पात्रता – उमेदवार किमान १० वी / १० वी आणि आय.टी.आय उत्तीर्ण असावा.
क्रिडा पात्रता – वर्ल्डकप (ज्युनिअर/युथ/सिनिअर), वर्ल्ड चॅम्पियनशिप (ज्युनिअर/ सिनिअर), एशियन गेम्स (सिनिअर)
किंवा कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा कॉमन वेल्थ चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/ एशियन चॅम्पियनशीप/ एशिया कप (ज्युनिअर/ सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर) /USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर)/वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे. किंवा सिनिअर/युथ/ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पीयनशीपमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा फेडरेशन कप सिनिअर गटात प्रथम स्थान प्राप्त केलेले असावे.
टीप – उमेदवारांची क्रिडा पात्रता दि. १ एप्रिल २०२२ नंतरची धरली जाईल.
वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ या दरम्यान असावे.
सर्व पदांसाठी समान अटी – १) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील. २) पदसंख्येत बदल गृहीत धरावा.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड क्रिडा प्रात्यक्षिक चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची १०० गुणांची क्रिडा प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येईल. यामध्ये खेळाचे कौशल्य, शारीरिक तंदुरुस्तीसाठी (४० गुण), क्रिडा पात्रता (५० गुण), शैक्षणिक पात्रता (१० गुण) या गुणांवर आधारीत निवड केली जाईल. यामध्ये पात्र होण्यासाठी वेतनश्रेणीनुसार ६५ ते ७० गुण मिळविणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या २ स्व:साक्षांकित प्रती तसेच २ पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ प्रतींसह उपस्थित राहणे आवश्यक. येताना स्वत:चे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. अजा/अज उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.५००/- तर अजा/ अज/महिला/अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना परीक्षा फी रु.२५०/-अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/ डेबीट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. जे उमेदवार निवडीसाठी उपस्थित राहतील अशा उमेदवारांना नियमाप्रमाणे परीक्षा फी त्यांच्या बँक खात्यावर परत केली जाईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://www.nfrrecruitment.in/ या वेबसाईटवरून दि. १० डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा.प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) खेळाडू प्रमाणपत्रे ४) वयाचा पुरावा ५) जात प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) अल्पसंख्यांक असल्यास तसे प्रमाणपत्र ७) आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांनी उत्पनाचा दाखला ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ १०) बँक पासबूक उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.rrcer.com ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १० डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *