एनएचपीसी लि.: ६४ अप्रांटीस ट्रेनीज २०२४ - govtjobsu.com

एनएचपीसी लि.: ६४ अप्रांटीस ट्रेनीज २०२४

omkar
4 Min Read

एनएचपीसी लिमिटेड : अप्रांटिस ट्रेनीज् पदांकरीता आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक ३० मे २०२४ पूर्वी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – अप्रांटिस ट्रेनी

एकुण पदसंख्या – ६४

ट्रेड नुसार पदविभागणी –

१) पदाचे नाव – कोपा – पदसंख्या – १२

२) पदाचे नाव – वेल्डर – पदसंख्या – ३

३) पदाचे नाव – स्टेनोग्राफर ॲण्ड सेक्रेटरीअल असिस्टंट – पदसंख्या – १० 

४) पदाचे नाव – प्लंबर – पदसंख्या – २

५) पदाचे नाव – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – पदसंख्या – ५

६) पदाचे नाव – इलेक्ट्रीशिअन – पदसंख्या – १५

७) पदाचे नाव – फिटर – पदसंख्या – ५

८) पदाचे नाव – मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – पदसंख्या – ५

९) पदाचे नाव – वायरमन – पदसंख्या – २

१०) पदाचे नाव – टर्नर – पदसंख्या – २

११) पदाचे नाव – मशिनिस्ट – पदसंख्या – ३

 

पात्रता – उमेदवार संबंधीत ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.

शारीरिक पात्रता – उंची किमान १३७ सें.मी., वजन किमान २५.४ किग्रॅ

वयोमर्यादा – दि. १० मे २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.

विद्यावेतन – उमेदवारांना नियमानुसार विद्यावेतन अदा केले जाईल.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) यापूर्वी अप्रांटीस पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र ३) फक्त २०१९,२०२०, २०२१, २०२२, २०२३, २०२४ या शैक्षणिक वर्षामधील उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय चाचणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि अर्जासोबत जोडलेल्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती आणि फोटो असलेले ओळख पत्र (पॅनकार्ड/ आधारकार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी https:// www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वरुन नोंदणी करावी. एस्टॅब्लीशमेंट सर्चमधुन एनएचपीसी लिमिटेड (E05200500184) साठी अर्ज करावा. अर्ज करावा. त्यानंतर विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त पोस्टाने पाठवावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे २) आय.टी.आय. गुणपत्र व प्रमाणपत्र ३) वयाचा दाखला ४) जातीचे प्रमाणपत्र ५) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ६) आधारकार्ड ७) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application for the post of……….” असे लिहिणे आवश्यक. तसेच उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकीत प्रती व पोलीस व्हेरीफिकेशन प्रमाणपत्र आणि चारित्र्याचा दाखला निवडीच्या वेळी सादर करावा. ”

अर्ज करण्याचा पत्ता – Dy. Manager (HR), Tanakpur Power Station, NHPC Limited, Banbasa, District Champawat, PIN-262310

 

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – दि. ३० मे २०२४

विहित नमुन्यातील अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – १० जून २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *