प्री-मेडिकल / प्री-डेंटल प्रवेश परीक्षा : NEET २०२४ प्रवेश परीक्षेसाठी १२ वी उत्तीर्ण/ बसलेल्या उमेदवारांकडून दि. ०९ मार्च २०२३ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
परीक्षेचे नाव – NEET : प्री-मेडिकल/प्री-डेंटल प्रवेश परीक्षा २०२४
पात्रता – एमबीबीएस/बीडीएस प्रवेशासाठी – ओपन उमेदवार किमान ५०% गुणांनी १२ वी विज्ञान (फिजीक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी/बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्रजी विषयांसह) उत्तीर्ण असावा. ओबीसी/अजा/अज उमेदवारांना टक्केवारीमध्ये १० % तर अपंग उमेदवारांना ५% सवलत. १२ वीस बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र मात्र, प्रवेशावेळी १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करावे लागेल. किंवा उमेदवार बी.एस्सीच्या (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी विषयांसह) प्रथम वर्षात शिकत असावा किंवा बी.एस्सी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – ओपन उमेदवाराचे वय किमान १७ वर्षे असावे म्हणजेच उमेदवाराचा जन्म ३१ डिसेंबर २००७ पूर्वी झालेला असावा.
परीक्षेचे स्वरुप – लेखी परीक्षेमध्ये फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी (बॉटनी/झुलॉजी) या विषयांवर आधारित १८० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. लेखी परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी किंवा मराठी असेल. लेखी परीक्षेसाठी फक्त निळ्या/काळ्या बॉलपाईंट पेनचा वापर करावा. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक.
ड्रेसकोड बाबत – उमेदवारांनी परीक्षेला जातेवेळी फिकट रंगाचे हाफ स्लीव्हज् असलेले सलवार कमीज/ ट्राउजर्स परीधान करणे आवश्यक आहे. तसेच पायात स्लिपर्स किंवा उंच टाचा नसलेले सॅण्डेल्स घालावेत.
परीक्षा दिनांक व वेळ – ०५ मे २०२४ रोजी दुपारी २ ते ५.२०
परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, सोलापूर, अकोला ही परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्राजवळचे पणजी (गोवा) हे परीक्षा केंद्र आहे. इतर परीक्षा केंद्रांसाठी वेबसाईट पहावी.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावीत. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹१७००ईडब्ल्युएस, ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹१६००/- तर अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹१०००/- अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्जकरणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. या मोबाईल उमेदवारांनी www.ntaneet.nic.in वेबसाईटवरून दि. ०९ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. ०१ जानेवारी २०२४ नंतर काढलेला पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो (पोस्टकार्ड व पासपोर्ट दोन्ही आकारातील, फोटोवर उमेदवारांचे नाव आणि फोटो काढलेला दिनांक लिहिणे आवश्यक) व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, उजव्या व डाव्या हाताच्या बोटांचे ठसे स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) ०१ जानेवारी ऑनलाईन २०२४ नंतर काढलेला पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो (पोस्टकार्ड व पासपोर्ट दोन्ही आकारातील, फोटोवर उमेदवारांचे नाव आणि फोटो काढलेला दिनांक लिहिणे आवश्यक) व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, उजव्या व डाव्या हाताच्या बोटांचे ठस २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधारकार्ड उमेदवारांनी परीक्षेवेळी प्रवेशपत्रासोबत, ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट, ई-रिसीट यांच्या झेरॉक्स प्रती आणि ऑनलाईन अर्जात अपलोड केलेल्या फोटोच्या काही कॉपीज स्वत:जवळ ठेवाव्यात. इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी www.ntaneet.nic.in ही वेबसाईट वेळोवेळी पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. ०९ मार्च २०२४ संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक-दि. ०९ मार्च २०२४ रात्री ११.५० वाजेपर्यंत