नेव्ही : मेडीकल असिस्टंट्स पदांसाठी १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहित पुरुष उमेदवारांकडून दि. १७ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – सेलर (मेडीकल असिस्टंट)
पात्रता – उमेदवार किमान ५० % गुणांनी गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासह १२वी उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता – उंची : किमान १५७ सें.मी. वजन : उंचीच्या प्रमाणात. छाती : कमीत कमी ५ सेंमी फुगणे आवश्यक. दृष्टी : चष्म्याशिवाय चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९ तर चष्म्यासह चांगला डोळा ६/६ तर खराब डोळा ६/६. तिरळेपणा, रातआंधळेपणा, रंगांधळेपणा, बहीरेपणा तसेच गुडघ्याला गुडघे टेकणे, फुगलेल्या शिरा इ. दोष असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
वयोमर्यादा – उमेदवारांचा जन्म ०१ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
वेतनश्रेणी – प्रशिक्षण काळात उमेदवारांना रु.१४,६००/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना रु.५२००-२०२०० + ग्रेड पे रु.२००० + मिलिटरी सर्व्हिस पे रु.५२०० अशा नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. याशिवाय विनामूल्य वैद्यकीय सेवा, स्वत:साठी तसेच अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी सवलतीच्या दरात प्रवास, ग्रुप हाऊसिंगचे फायदे, सेलरसाठी ७५ लाखांचा विमा इ. सुविधा देण्यात येतील. वार्षिक पगारी रजा, पगारी किरकोळ रजा दिली जाईल. याशिवाय निवृत्तीनंतरचे पेन्शन, ग्रॅच्युइटी व शिल्लक रजेपोटी रक्कम अदा केली जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणी याद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची व १ तास कालावधीची असेल. यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्यज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल तसेच परीक्षेचा स्तर १२ वी समान असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. उमेदवारांनी प्रत्येक विषयात स्वतंत्ररित्या उत्तीर्ण होणे आवश्यक.
ऑनलाईन परीक्षेचा निकाल अदांजे ३० दिवसांनी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यामध्ये १.६ कि.मी. धाव ६ मिनिट ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे, २० उठक बैठक आणि १५ पुशअप्स, १५ बेंट नी सीटअप्स अशा चाचण्यांचा समावेश असेल. यामधील पात्र उमेदवारांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. प्राथमिक वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार २१ दिवसाच्या आत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पुन्हा आपली वैद्यकीय चाचणी करुन घेऊ शकतात. प्राथमिक वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. यामधील उमेदवारांनी अंतिम वैद्यकीय चाचणीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत संबंधित जिल्ह्याचा पोलिस व्हेरिफिकेशन फॉर्म सोबत घेऊन जाणे आवश्यक. पोलीस व्हेरीफिकेशन फॉर्म वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. अंतिम वैद्यकिय चाचणीमध्ये वैद्यकीयदृष्ट्या तात्पुरते नाकारलेले उमेदवार २१ दिवसाच्या आत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पुन्हा आपली वैद्यकीय चाचणी करुन घेऊ शकतात. मात्र त्यासाठी शासकीय कोषागारात मिलिटरी रिसीव्हेबल ऑर्डर (MRO) द्वारे रु.४० भरावे लागतील. ही चाचणी INS चिल्का येथे होईल. अंतिम वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – प्रवेशपत्राबाबत उमेदवारांना ई-मेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र इ.) तसेच सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रशिक्षण – प्रशिक्षण नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरु होईल. प्रथम आयएनएस चिल्का (ओरिसा) येथे ९ आठवड्यांचे पायाभूत प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारास ट्रेड प्रदान करण्यात येतील. प्रदान केलेल्या ट्रेडप्रमाणे उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण काळात अभ्यासाचे साहित्य, युनिफॉर्म, राहणे, जेवण इ. विनामूल्य दिले जाईल.
बढत्या – सुरुवातीची सेवा २० वर्षाची असून ती वाढवता येईल. उमेदवारांना मास्टर चिफ पेटी ऑफिसरपर्यंत बढती मिळेल. परीक्षा देऊन उमेदवारास पुढे कमिशन्ड ऑफिसरही होता येईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. या साठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटवरुन दि. १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड स्वतःजवळ नोंद करून ठेवावा. त्यांनतर अर्जामध्ये आवश्यक ती माहीती भरावी. निळी बॅकराऊंड असलेला फोटो, काळ्या शाईच्या पेनाने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. त्यानंतर अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) निळी बॅकराऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) दहावीचे गुणपत्र व प्रमाणपत्र ३) १२ वी चे गुणपत्रक ४) आधारकार्ड ५) डोमेसाईल प्रमाणपत्र ६) एनसीसी प्रमाणपत्र (असल्यास)
उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत वरील प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी व निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी उमेदवारांनी www.joinindiannavy.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १७ सप्टेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *