( Naval Dockyard, Mumbai )
इंडियन नेव्ही:नावल डॉकयार्ड, मुंबई : ३०१ अप्रांटीस पदांसाठी आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०६ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – अप्रांटिस ट्रेनी,
एकूण पदसंख्या – ३०१ (ओपन १४७, ओबीसी ५७, अजा ३०, अज २७)
* ट्रेडनुसार पदविभागणी *
१) इलेक्ट्रीशियन – ४० (ओपन २४, ओबीसी ८, अजा ४, अज ४)
२) इलेक्ट्रोप्लेटर – ओपन १
३) फिटर – ५० (ओपन ३०, ओबीसी १०, अजा ५, अज ५)
४) फौंडरी – ओपन १
५) मेकॅनिक (डिझेल) – ३५ (ओपन २१, ओबीसी ७, अजा ४, अज ३)
६) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक – ७ (ओपन ४, ओबीसी १, अजा १, अज १)
७) मशिनिस्ट – १३ (ओपन ८, ओबीसी ३, अजा १, अज १)
८) मेकॅनिक मशिन टूल मेंटेनंन्स – १३ (ओपन ८, ओबीसी ३, अजा १, अज १)
९) पेंटर – ९ (ओपन ५, ओबीसी २, अजा १, अज १)
१०) पॅटर्न मेकर कार्पेटर – ओपन २
११) पाईप फिटर (प्लंबर) – १३ (ओपन ८, ओबीसी ३, अजा १. अज १)
१२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २६ (ओपन १६, ओबीसी ५, अजा ३, अज २)
१३) मेकॅनिक रेफ्रिजरेशन अॅण्ड एसी – ७ (ओपन ४, ओबीसी १, अजा १, अज १)
१४) शिट मेटल वर्कर – ओपन ३
१५) शिपराईट (वूड) (कार्पेटर) – १८ (ओपन ११, ओबीसी ३, अजा २, अज २)
१६) टेलर जनरल (स्विंग टेक्नॉलॉजी/ ड्रेस मेकिंग) – १८ (ओपन ११, ओबीसी ३, अजा २, अज २)
१७) वेल्डर (गॅस ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) (वेल्डर) – २० (ओपन १२, ओबीसी ४, अजा २, अज २)
१८) मेसन – ८ ( ओपन ४, ओबीसी २, अजा १, अज १)
१९) आय ॲण्ड सीटीएसएम – ओपन ३
२०) शिपराईट (स्टील) – १६ (ओपन १०, ओबीसी ३, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार किमान ५० % गुणांनी १० वी आणि किमान ६५ % गुणांनी संबंधित ट्रेडमधून आय. टी. आय उत्तीर्ण असावा.
२१) रिगर – १२ (ओपन ८, ओबीसी २, अजा १ अज १)
२२) फोर्जर ॲण्ड हीट ट्रीटर – ओपन १
पात्रता – उमेदवार किमान ८ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. ०१ जून २००३ ते ३१ जून २०१० (दोन्ही दिवस धरुन) दरम्यान झालेला असावा. अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. सैनिकांच्या पाल्यांना वयात २ वर्षे सवलत.
शारिरीक पात्रता – उंची – किमान १५० सें.मी सेमी वजन – किमान ४५ किग्रॅ छाती – किमान ५ सें.मी फुगणे आवश्यक. दृष्टी, चष्म्यासह ६/६, ६/९ असावी.
प्रशिक्षण कालवधी – १ वर्ष
विद्यावेतन – उमेदवारांना नियमानुसार विद्यावेतन दिले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दि. ०६ एप्रिल २०२४ रोजीची धरली जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत / स्कील टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची व २ तास कालावधीची असेल. यामध्ये विज्ञान, सामान्यज्ञान आणि गणित, इंग्रजी आणि संबंधीत विषयाचे ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. ‘लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असले. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट/ मुलाखत घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी, वैद्यकिय तपासणी व चारित्र्य पडताळणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
लेखी परीक्षा दिनांक – मे २०२४.
लेखी परीक्षा केंद्र – मुंबई
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी कोणतीही परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.dasapprenticembi.recttindia.in या वेबसाईटवरून दि. ०६ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. पांढरी बॅकग्राऊंड असलेला फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकग्राऊंड असलेला फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) दहावीचे प्रमाणपत्र ४) जात प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ८) सैनिकांचे पाल्य असल्यास तसे प्रमाणपत्र ९) आधार कार्ड उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.dasapprenticembi.recttindia.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. ०६ एप्रिल २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *