नॅशनल इन्स्टि ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी : असिस्टंट इ. पदांसाठी पदवी/नर्सिंग/जीएनएम उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०९ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – मशिन मॅकेनिक
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/मेकॅनिक/टूल ॲण्ड डाय मेकर) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
२) पदाचे नाव – असिस्टंट (फायनान्स ॲन्ड अकाऊंटस)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार वाणिज्य शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार वाणिज्य शाखेतून उच्च पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नाव – असिस्टंट वॉर्डन (ग्रुप C) (महिला)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवी उत्तीर्ण असावा. शासकीय/निमशासकीय/स्वायत्त संस्थेतील संबंधित कामाचा. किमान १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
४) पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. लघुलेखन गती ८० श.प्र.मि. आणि टायपिंग गती ४० श.प्र.मि. असणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/स्वायत्त संस्थेतील संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
५) पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट
पदसंख्या – ५ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १)
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. संगणकावर टायपिंग गती इंग्रजी ३० शप्रमी किंवा हिंदी २५ शप्रमी आवश्यक. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
६) पदाचे नाव – लायब्ररी असिस्टंट
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. तसेच लॅबररि सायन्स डिप्लोमा उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार लॅबररि सायन्स विषयातून पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ०९ एप्रिल २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २७ वर्षापर्यंत असावे तर वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी १३ वर्षे तर अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – पद क्र ५ व ६ साठी ₹५२००-२०२०० /- + ग्रेड पे १९००/- तर उर्वरित सर्व पदांसाठी ₹५२००-२०२००/-+ ग्रेड पे २४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय इतर सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/स्कील टेस्टद्वारे कळविण्यात येईल. निवडबाबत उमेदवारांना नंतर केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल / एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना रु.५०० + १८% जीएसटी (एकूण ५९०) अशी परीक्षा फी असून ती “NIFT Kolkata” यांचे नावे पेयेबल ॲट Kolkata अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डी.डी स्वरूपात अर्जासोबत जोडावी. उमेदवाराने डी.डी च्या पाठीमागे स्वतःचे नाव, पत्ता व पदाचे नाव लिहिणे आवश्यक. अजा/अज/ अपंग/महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी नाही. अर्ज कसा करावा उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत. उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. उमेदवारांस एक पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास त्यांना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र फी भरणे आवश्यक.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) परीक्षा फी डी.डी २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला ५) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७). उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा.
उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POS OF “ असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळेस वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – Joint Director, National Institute of Fashion Technology, NIFT Campus, Block-LA, Plot-3B, Sector-III, Salt Lake City, Kolkata-700106
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ०९ एप्रिल २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *