नॅशनल फर्टिलायझर्स : १६४ मॅनेजमेंट ट्रेनीज २०२४ - govtjobsu.com

नॅशनल फर्टिलायझर्स : १६४ मॅनेजमेंट ट्रेनीज २०२४

omkar
8 Min Read

नॅशनल फर्टिलायझर्स लि. : १६४ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी पदवी/उच्चपदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १७ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल),

पदसंख्या – ५० (ओपन २४, ईडब्ल्यूएस ५, ओबीसी १५, अजा ७, अज ५) पैकी अपंग ३ (कर्णबधीर १, अल्पदृष्टी १, बहुविध अपंगत्व १)

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज / अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (केमिकल इंजि. / केमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – मैनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल),

पदसंख्या – १८ (ओपन ८, ईडब्ल्युएस १, ओबीसी ६, अजा २. अज १) पैकी कर्णबधीर १

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा.

 

३) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रीकल),

पदसंख्या – २१ (ओपन ११, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ४, अजा २, अज २) पैकी अस्थिव्यंग १

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज /अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा.

 

४) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन),

पदसंख्या – १७ (ओपन ९, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ५, अजा २)

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई / बीटेक/बी.एस्सी इंजि. (इन्स्ट्रमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन अँण्ड कंट्रोल/इन्स्ट्रुमेंटेशन अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इन्स्टुमेंटेशन / इंडस्ट्रीअल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कंट्रोल इंजि. / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा.

 

५) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील),

पदसंख्या – (ओपन २, ओबीसी १)

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (सिव्हील) उत्तीर्ण असावा.

 

६) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल लॅब),

पदसंख्या – १२ (ओपन ६, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा २, अज १) पैकी अस्थिव्यंग १

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग उमेदवार ५० % गुणांनी) एम.एस्सी (केमिस्ट्री/इनऑग्रॅनिक केमिस्ट्री / ऑग्रॅनिक केमिस्ट्री/अँनालीटीकल केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री/ अँप्लाईड केमिस्ट्री/इंडस्ट्रीअल केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा.

 

७) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (फायर अँण्ड सेफ्टी),

पदसंख्या – (ओपन ३, ओबीसी १, अजा १)

पात्रता – उमेदवार किमान ६०% गुणांनी बीई / बीटेक (फायर इंजि./सेफ्टी अँण्ड फायर इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार किमान ६० % गुणांनी बीई / बीटेक/बी.एस्सी इंजि (इलेक्ट्रीकल / मेकॅनिकल/केमिकल) आणि नॅशनल फायर सर्व्हींस कॉलेजचा डिव्हीजन ऑफीसर चा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असावा.

 

८) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी),

पदसंख्या – (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा १)

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (कॉम्प्युटर सायन्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) एमसीए उत्तीर्ण असावा.

 

९) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मटेरीअल्स),

पदसंख्या – ११ (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा २, अज १) पैकी अल्पदृष्टी १

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज / अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (मेकॅनिकल/मटेरीअल सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी/ मटेरीअल सायन्स अँण्ड इंजि.) उत्तीर्ण असावा.

 

१०) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्स),

पदसंख्या – १६ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा ३, अज २)

पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५०% गुणांनी) एमबीए / पीजी डिप्लोमा (ह्युमन रिसोर्स / पर्सोनेल मॅनेजमेंट/पर्सोनेल मॅनेजमेंट अँण्ड इंडस्ट्रीअल रिलेशन्स / घुमन रिसोर्स मॅनेजमेंट/ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट/ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँण्ड मॅनेजमेंट/लेबर लॉ अँण्ड पर्सोनेल मॅनेजमेंट) उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा – दि. ३१ मे २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे, ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात ५ वर्षे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. ४००००-१,४०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि. ३१ मे २०२४ रोजीची धरली जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १५० गुणांची व २ तास कालावधीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित ( १०० प्रश्न १०० गुण) आणि इंग्रजी, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि सामान्यज्ञान यावर आधारित (५० प्रश्न – ५० गुण) प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल तसेच चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमध्ये ५० % गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी, वैद्यकीय चाचणी आणि चारीत्र्य पडताळणी करुन अंतिम निवड केली जाईल. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार प्रवासखर्च दिला जाईल.

लेखी परीक्षा केंद्रे – मुंबई, हैद्राबाद, बेंगलोर, भोपाळ, अहमदाबाद, दिल्ली, लखनऊ, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, जयपूर, रायपूर, रांची, कोची, विजयवाडा, जम्मु काश्मिर

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावे. ऑनलाईन परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची साक्षांकीत प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक..

परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी रु. ७००/- अशी असून ती नेटबँकींग / क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.nationalfertilizers.com या वेबसाईटवरून दि. १७ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला) रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही..

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला) रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) फोटो असलेलेल ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / लायसन्स) ५) जातीचा दाखला ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ड्रायव्हिंग उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, वरील सर्व प्रमाणपत्रे इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.nationalfertilizers.com ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १७ जुलै २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

इतर सुचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी/इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती इंग्रजी/हिंदी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *