महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी: ३२१ ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनीज् पदांसाठी इंजि. पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २० मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ग्रॅज्युएट इंजिनिअर – ट्रेनी (डिस्ट्रीब्युशन)
पदसंख्या – २८१ (ओपन १९ पैकी महिला ६, खेळाडू १, माजी सैनिक ३, इतर ९, ईडब्ल्यूएस २८ पैकी महिला ८, खेळाडू १, माजी सैनिक ४, इतर १५, ओबीसी १३७ पैकी महिला ४१, खेळाडू ७, माजी सैनिक २१, इतर ६८, अजा ४३ पैकी महिला १३, खेळाडू २, माजी सैनिक ६, इतर २२, विजाअ १० पैकी महिला ३, खेळाडू १, माजी सैनिक २, इतर ४, भजब ५ पैकी महिला २, माजी सैनिक १, इतर २, भजक ९ पैकी महिला ३, माजी सैनिक १, इतर ५, भजड १३ पैकी महिला ४, खेळाडू १, माजी सैनिक २, इतर इतर ६, विमाप्र १७ पैकी महिला ५, खेळाडू १, माजी सैनिक ४, इतर ८) पैकी अपंग १३ (कर्णबधीर/ एका पायाने अपंग), अनाथ ३
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई/बी.टेक (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. गेट परीक्षा २०२१/२०२२/२०२३ उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – ग्रॅज्युएट इंजिनिअर – ट्रेनी (सिव्हिल)
पदसंख्या – ४० (ओपन ६ पैकी महिला २, माजी सैनिक १, इतर ३, ईडब्ल्यूएस ६ पैकी महिला २, माजीसैनिक १, इतर ३, ओबीसी १० पैकी महिला ३, खेळाडू १, माजीसैनिक २, इतर ४, अजा ७ पैकी महिला २, माजीसैनिक १, इतर ४, अज ५ पैकी महिला २, माजी सैनिक १, इतर २, विजाअ १, भजक २ पैकी महिला १, इतर १, भजड २ पैकी महिला १, इतर १, विमाप्र १ पैकी अपंग २
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई/बी.टेक (सिव्हिल) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. गेट परीक्षा २०२१/२०२२/ २०२३ उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. २० मार्च २०२४ रोजी साठी ३५ असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिक / अपंग उमेदवारांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. खेळाडू उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. MSEDCL मधील कर्मचाऱ्यांसाना वयात ५७ वर्षांपर्यंत सवलत. MSEDCL कंपनीमध्ये अप्रांटिस ट्रेनींग पूर्ण केलेल्या उमेदवारांना ट्रेनींग कालावधीएवढी वयात सवलत.
वेतनश्रेणी – प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना ₹२२,०००/- द. म असे विद्यावेतन अदा केले जाईल. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर असिस्टंट इंजिनिअर या पदावर नियुक्ती देऊन ₹ ४९२१०-११९३१५/- अशा नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. २० मार्च २०२४ रोजीचा धरला जाईल. ३) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. ४) प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची क्रिडाविषयक प्रमाणपत्रे योग्य दर्जाची असल्याबाबत व ते खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याबाबत, सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यापूर्वी प्राप्त करणे आवश्यक आहे.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड गेट परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन गेट परीक्षा २०२१/२०२२/२०२३ मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई- मेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेच्या १० दिवस आधी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी ₹५००/- + जी.एस.टी १८ % तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹२५०/- + जी.एस.टी १८ % अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अपंग व माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.mahadiscom.in या वेबसाईटवरून दि. २० मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधारकार्ड ४) जातीचा दाखला ५) सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र ६) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, ओबीसी, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक -दि. २० मार्च २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *