महाराष्ट्र लोकसेवा आयोग : समाज कल्याण अधिकारी पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – समाज कल्याण अधिकारी
पदसंख्या – २२ (ओपन ६ पैकी महिला २, इतर ४, एसईबीसी २ पैकी महिला १, इतर १, ईडब्ल्यूएस २ पैकी महिला १, इतर १, ओबीसी ५ पैकी महिला २, इतर ३, अजा ३ पैकी महिला १, इतर २, अज १, विजाअ १, भजब १, भजक १) पैकी अपंग १
आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या समाज कल्याण अधिकारी, गट-ब (जाहिरात क्रमांक ०२४/२०२३) करीता अर्जाद्वारे. फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. ब (जाहिरात क्रमांक समाज कल्याण अधिकारी, गट-०२४/२०२३) या संवर्गाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा गणण्याचा दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ असा राहील. तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक मूळ जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक ०५ जून, २०२३ असा राहील.
समाज कल्याण अधिकारी, गट-ब (जाहिरात क्रमांक ०२४/२०२३) करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्यासाठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे म्हणजेच दिनांक ०७ जून, २०२४ पूर्वीचे असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *