MPSC : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील विधी अधिकारी पदांसाठी कायदा पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २६ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – विधि अधिकारी, गट-अ
पदसंख्या – १२ (ओपन ३ पैकी महिला १, खेळाडू १, इतर १, ईडब्ल्यूएस महिला १, ओबीसी २ पैकी महिला १, इतर १, अजा २ पैकी महिला १, इतर १, अज १, विजाअ १, भजब १)
पात्रता – उमेदवार कायदा पदवी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा ७ वर्षांचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. ६७,७००-२,०८,७००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी वयोमर्यादा – दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते ३८ पर्यंत असावे. वयामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत. खेळाडू ४३ वर्षांपर्यंत, अपंग ४५ वर्षापर्यंत तर माजी सैनिक उमेदवारांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत व आरक्षणात बदल गृहीत धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड चाळणी लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास परीक्षेबाबत सर्व तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. मुलाखतीच्यावेळेस सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसेन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रोबेशन कालावधी – २ वर्ष
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या ७ दिवस आधी वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेणे आवश्यक आणि चाळणी परीक्षा/मुलाखतीच्यावेळेस सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांना परीक्षा फी रु. ७१९/- तर मागासवर्गीय उमेदवारांना रु. ४४९/- अशी असून ती नेटबँकींग / डेबिट कार्ड/क्रेडीटकार्डद्वारे भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.mpsconline.gov.in या वेबसाईटवरून दि.२६ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी. अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र ४) सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र. ५) खेळाडू असल्यास क्रिडा पात्रता प्रमाणपत्रे ६) आधारकार्ड ७) डोमेसाईल प्रमाणपत्र ८) जात प्रमाणपत्र, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ९) लागू असल्यास नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र १०) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र ११) मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १३) नावात बदल झाले असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, एसईबीसी, ओबीसी, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, अंशकालीन उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र/गॅझेट इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी निवड़ीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.mpsconline.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – २६ ऑगस्ट २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
इतर सूचना – १) विवाहीत महिला उमेदवार किंवा नावात बदल केलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र/गॅझेट व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक. २) परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून ई-आधार सोबत घेऊन जाणार असल्यास ई- आधारवर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधारकार्ड डाऊनलोड केले असल्यासच ई- आधार वैध मानण्यात येईल.