krushi vigyan kendra sporting staff recruitment in maharashtra | कृषी विज्ञान केंद्र लातूर सपोर्टिंग स्टाफ भर्ती - govtjobsu.com

krushi vigyan kendra sporting staff recruitment in maharashtra | कृषी विज्ञान केंद्र लातूर सपोर्टिंग स्टाफ भर्ती

omkar
3 Min Read

krushi vigyan kendra, latur : सपोर्टिंग स्टाफ इ. पदांसाठी १० वी / पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २२ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – फार्म मॅनेजर,

पदसंख्या –

पात्रता –  उमेदवार पदवी (अँग्रीकल्चर) उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – सपोर्टिंग स्टाफ,

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार १० वी /आयटीआय उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा – दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पद क्रमांक १ साठी ३० वर्षांपर्यंत तर उर्वरीत पद क्रमांक २ साठी २५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी रु.९,३०० – ३४,८०० + ग्रेड पे रु.४२००/-, पद क्रमांक २ साठी रु.५,२०० – २०,२०० + ग्रेड पे रु.१८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. निवडीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पासपोर्ट/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांसाठी रु.५००/- अशी परीक्षा फी असून Manjara Krishi Vigyan Kendra, Revolving Fund, Latur यांच्या नावे Payable at Latur अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डी.डी. स्वरुपात अर्जासोबत जोडावी. अजा/अज / महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) डी.डी. २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) अपंग असल्यास तसा दाखला ६) पद क्र.३ साठी वाहन चालवण्याचा परवाना ७) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ८) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला फोटो चिकटवावा. उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Appication for the post of________” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र जोडावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळी वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज करण्याचा पत्ता – “Senior Scientist and Head, Krishi Vigyan Kendra, Latur, Add MIDC Plot No. P-160, Harangul (B), Near Mahadev Nagar, PostGangapur, Tq. Dist. Latur-413531 (Maharashtra)”

 

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २२ डिसेंबर २०२४.

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *