कृषी विज्ञान केंद्र, बारामती : स्कील्ड सपोटींग स्टाफ पदासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १२ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – स्कील्ड सपोटींग स्टाफ
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट लागू नाही.
वयोमर्यादा – दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी उमेदवाराचे वय २५ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा / अज उमेदवारांना वयात ५ वर्षांपर्यंत सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹५२००-२०२००/- + ग्रेड पे₹ – १८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते अदा केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ड्रायव्हिंग लायसेन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹५००/- अशी परीक्षा फी असून ती “Krishi Vigyan Kendra, Baramati” यांचे नावे पेयेबल ॲट Baramati अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डी.डी स्वरूपात अर्जासोबत जोडावी. अजा/अज/अपंग (दिव्यांग)/ महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी नाही. इतर कोणत्याही माध्यमातून परीक्षा फी स्वीकारली जाणार नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टानेच पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ४) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अॅण्ड अँसेट प्रमाणपत्र ५) अपंग असल्यास तसा दाखला ६) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ७) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा.
उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application for the post of Skilled Supporting Staff” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळी वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – Chairman, Agricultural Development Trust, Sharadanagar, Malegaon Khurd, Baramati, Dist, Pune, Pin-413115
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – १२ फेब्रुवारी २०२४