ITBP-इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स : असिस्टंट सर्जन (असिस्टंट कमांडंट/व्हेटर्नरी) पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २४ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – असिस्टंट सर्जन (असिस्टंट कमांडंट/व्हेटर्नरी)
पदसंख्या – २७ (ओपन १२, ईडब्ल्यूएस ४, ओबीसी ६, अजा ४, अज १)
पात्रता – उमेदवार पदवी (व्हेटर्नरी सायन्स अँण्ड अँनिमल हजबंडरी) उत्तीर्ण असावा. व्हेटर्नरी कौन्सीलकडे नोंदणी असणे आवश्यक.
शारीरिक पात्रता |
|||
पुरूष उमेदवारांसाठी |
|||
उंची |
छाती |
||
|
न फुगवता |
फुगवून |
|
१५७.५ सेंमी |
७७ सेंमी |
८२ सें.मी. |
महिला उमेदवारांसाठी |
||
उंची |
||
१४२ सेंमी |
वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात असावे.
दृष्टी – जवळची दृष्टी चांगला डोळा N ६ खराब डोळा N९ आणि दुरदृष्टी चांगला डोळा ६/६ आणि खराब डोळा ६/९. कलर व्हीजन CP III असणे आवश्यक. गुडघ्याला गुडघे टेकणे, सपाट तळवे, तटतटलेल्या शिरा, रातांधळेपणा, रंगांधळेपणा, तिरळेपणा इत्यादी विकार असलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नयेत. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. अपंग उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
वयोमर्यादा – दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. २४ डिसेंबर १९८९ ते २४ डिसेंबर २००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे, अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. शासकीय कर्मचाऱ्यांना वयात ४० वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५६,१००-१,७७,५००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इंडो तिबेटियन पोलीस दलाच्या सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
सर्वपदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा २) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) एकुण पदसंख्येपैकी १० % जागा माजी सैनिकांसाठी राखीव
निवड पद्धत – उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकिय चाचणीद्वारे केली जाईल. यामध्ये चार फेज असतील. फेज १ मध्ये प्रथम उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी – ८०० मी धाव ३ मिनिट ४५ सेकंदामध्ये पूर्ण करणे, १०० मी धाव १६ सेकंदामध्ये पूर्ण करणे, लांब उडी – ३.५ मीटर (३ संधी), गोळाफेक (७.२६ कि.ग्रॅ) ४.५ मीटर तर महिला उमेदवारांसाठी – ८०० मी धाव ४ मिनिट ४५ सेकंदामध्ये पूर्ण करणे, १०० मी धाव १८ सेकंदामध्ये पूर्ण करणे, लांब उडी – ३ मीटर (३ संधी) यांचा समावेश असेल. माजी सैनिकांची ही चाचणी घेतली जाणार नाही. शारिरीक क्षमता चाचणीमधील पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी घेण्यात येईल. शारीरिक मोजमाप चाचणीमधील पात्र फेज २ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात येईल.
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची व २ तास कालावधीची असेल. यामध्ये संबंधित विषयाचे ज्ञान (१०० प्रश्न १०० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. लेखी परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी ओपन व माजी सैनिक उमेदवारांनी किमान ३५ % तर अजा उमेदवारांनी किमान किमान ३३ % गुण मिळविणे आवश्यक, लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची फेज ३ मध्ये ५० गुणांची मुलाखत आणि कागदपत्रे तपासणी केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची फेज ४ मध्ये वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे व २ ते ३ दिवस राहण्याच्या तयारीने यावे.
वैद्यकिय चाचणी बाबत – वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार १५ दिवसांच्या आता पुर्नचाचणीसाठी विनंती अर्ज करु शकतात.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.४०० असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/महिला/ मा. सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. या साठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटवरून दि. २४ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत: जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही. २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ५) जातीचा दाखला ६) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, डोमोसाईल प्रमाणपत्र/ आधारकार्ड/पॅनकार्ड, उंची व छातीमध्ये सवलत घेत असल्यास विहित नमुन्यातील प्रमाणपत्र व ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २४ डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *