(Inland waterways) अंतर्देशीय जलमार्ग ऑफ इंडिया : एमटीएस, स्टाफ कार ड्रायव्हर इ. पदांसाठी १० वी / १२ वी / डिप्लोमा/पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १५ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (एएचएस) (पोस्ट कोड – ०२/२०२४),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार इंजि पदवी (सिव्हील) उत्तीर्ण असावा. संबंधित कामचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – लायसन्स इंजिन ड्रायव्हर (पोस्ट कोड – ०३/ २०२४),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा तसेच प्रमाणपत्रकोर्स (लायसन्स इंजिन ड्रायव्हर) उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – ज्युनिअर अकौंट्स ऑफीसर (पोस्ट कोड ०४/२०२४),
पदसंख्या – ५ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १) पैकी अपंग १
पात्रता – उमेदवार बी.कॉम उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार बी.कॉम आणि इंटर सीए/इंटर आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – स्टोअर किपर (पोस्ट कोड – ०६/२०२४),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
५) पदाचे नाव – मास्ट सेकंड क्लास (पोस्ट कोड ०७/२०२४),
पदसंख्या – ३ (ओबीसी, अजा १, अज १)
पात्रता – उमेदवार सेकंड क्लास मास्टर प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.
६) पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर (पोस्ट कोड – २०२४),
पदसंख्या – ३ (ओपन २, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ८ वी उत्तीर्ण असावा. वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक. वाहन दुरुस्तीचे प्राथमिक ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
७) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ (पोस्ट कोड १०/२०२४),
पदसंख्या – ११ (ओपन २, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ४, अजा १, अज १) पैकी अपंग २
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
८) पदाचे नाव – टेक्निकल असिस्टंट (सिव्हील/मेकॅनिकल/ मरीन इंजि./नावल आर्कीटेक्चर) (पोस्ट कोड – ११/२०२४),
पदसंख्या – ४ (ओपन २, ओबीसी १, अज १)
पात्रता – उमेदवार संबंधित विषयामधुन इंजि पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पद क्रमांक १ व ५ साठी १८ ते ३५ वर्षांपर्यंत, पद क्रमांक ४ व ७ साठी १८ ते २५ वर्षापर्यंत असावे तर उर्वरीत सर्व पदांसाठी १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. विधवा/ घटस्फोटीत/कायद्यानुसार विभक्त परंतु पुर्नविवाह न केलेल्या महिला उमेदवारांना ओपन ३५ वर्षापर्यंत तर अजा/अज ४० वर्षापर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना उच्चतम वयोमर्यादेची अट लागू नाही..
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी रु.५६१००१७७५००/-, पद क्रमांक २, ३ व ८ साठी रु.३५४००११२४००/-, पद क्रमांक ४ व ५ साठी रु.२५५००-८११००/ -, पद क्रमांक ६ साठी रु.१९९००-६३२००/- तर पद क्रमांक ७ साठी रु.१८०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजीचें धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रोबेशन कालावधी – १ वर्षे
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेच्या १० ते १५ दिवस आधी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन, ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.५००/ – तर ईडब्ल्यूएस/अजा/अज/अपंग रु.२००/- अशी असून ती नेट बँकींग/क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.iwai.nic.in या वेबसाईटवरून दि. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत.
उमेदवारांनी फक्त एकाच पदासाठी अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. पांढरी बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र इ.
प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच ,स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १५ सप्टेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *