नेव्ही : सेलर खेळाडू भरतीसाठी १२ वी उत्तीर्ण अविवाहित पुरूष व महिला खेळाडू उमेदवारांकडून दि. २० जुलै २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
क्रीडा प्रकार – अँथलेटिक्स, अँक्वेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सींग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टीक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेट लिफ्टींग, रेसलिंग, स्क्वॅश, फेन्सिंग, गोल्फ, टेनिस, कयाकिंग अँण्ड कॅनोइंग, रोइंग, शुटींग, सेलिंग अँण्ड विंड सर्फिंग
१) डायरेक्ट एन्ट्री पेटी ऑफिसर,
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
क्रीडा पात्रता –
सांघिक – आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू किंवा राज्यस्तरीय/राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्युनिअर/सिनिअर स्तरावर देशाचे/राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू
वैयक्तिक – आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा ज्युनिअर नॅशनल स्पर्धांमध्ये ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा सिनिअर नॅशनल स्पर्धांमध्ये किमान ६ वे स्थान प्राप्त केलेले असावे
२) सेलर – डायरेक्ट एन्ट्री चिफ पेटी ऑफिसर,
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
क्रीडा पात्रता – वर्ल्ड चॅम्पीअनशिप/एशिअन चॅम्पीअनशिप / एशिअन गेम्स/वर्ल्ड कप मध्ये पदक प्राप्त केलेले असावे किंवा एशिअन गेम्स/कॉमन वेल्थ गेम्स/वर्ल्ड कप/ऑलम्पीक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
वय – उमेदवाराचे वय १७ १/२ ते २५ वर्षापर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०१ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००७ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
वेतनश्रेणी – प्रशिक्षण काळात उमेदवारांना रु. १४६००/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल. प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारांना रु. ५२००-२०२०० + ग्रेड पे रु. २८०० + मिलिटरी सर्व्हिस पे रु. ५२०० अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय नेव्हीच्या सर्व त्या आकर्षक सोयी, भत्ते, ५० लाखांचा विमा, पगारी रजा, प्रवासात सवलत, स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी विनामुल्य वैद्यकीय सेवा इत्यादी सोयी, सवलती अदा केल्या जातील.
शारीरिक पात्रता – उंची – किमान १५७ सें.मी., वजन उंचीच्या प्रमाणात असावे. छाती किमान ५ सें.मी. फुगविणे आवश्यक.
दृष्टी – SSR साठी – चष्म्याशिवाय – चांगला डोळा – ६/१२, खराब डोळा – खराब डोळा ६/६, : ६/१२, चष्म्यासह – चांगला डोळा – ६/६, उमेदवारास तिरळेपणा, रातआंधळेपणा, रंगांधळेपणा, बहीरेपणा नसावा. कलर परसेप्शन सीपी असणे आवश्यक. याशिवाय उमेदवाराची कोणत्याही प्रकारची मुख्य शारीरिक शस्त्रक्रिया झालेली नसावी. गुडघ्याला गुडघे टेकणे, तिरळेपणा, रातांधळेपणा, फुगलेल्या शिरा इ. दोष असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड क्रिडा चाचणी व वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची क्रिडा पात्रतेनुसार निवड यादी तयार केली जाईल. यामधील उमेदवारांची क्रीडा चाचणी घेतली जाईल. क्रीडा चाचणीमधील पात्र उमेदवारांची INS हमला, मुंबई येथे वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. निवडीच्यावेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रे आणि गुणपत्रांच्या मूळ प्रती व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रतींसह उपस्थित रहावे. उमेदवारांनी ३-४ दिवस राहण्याच्या तयारीने यावे. निवडीचा तपशील प्रवेशपत्रासोबत पाठविण्यात येईल.
वैद्यकीय चाचणीबाबत – वैद्यकीयदृष्ट्या पात्र उमेदवारांचीच अंतिम निवड केली जाईल. वैद्यकीयदृष्ट्या तात्पुरते नाकारले असल्यास, असे उमेदवार २१ दिवसाच्या आत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पुन्हा आपली वैद्यकीय चाचणी करुन घेऊ शकतात. वैद्यकिय चाचणीमध्ये कायमस्वरुपी नाकारले असल्यास असे उमेदवार २१ दिवसाच्या आत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पुन्हा आपली वैद्यकीय चाचणी करुन घेऊ शकतात, मात्र त्यासाठी उमेदवारांना रु. ४०/- मिलिटरी रिसीव्हेबल ऑर्डर (MRO) द्वारे शासकीय कोषागृहात भरावे लागतील.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (पॅनकार्ड / पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसन्स / मतदान ओळखपत्र / आधारकार्ड) तसेच सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रशिक्षण – निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम INS चिल्का (ओरिसा) येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यानंतर विविध नावल ट्रेनींग एस्टॅब्लिशमेंटमध्ये दिलेल्या ट्रेडप्रमाणे पुन्हा व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण काळात उमेदवारांना अभ्यासाचे साहित्य, युनिफॉर्म, रहाणे, जेवण इ. विनामूल्य दिले जाईल.
बढत्या – उमेदवारांना मास्टर चिफ पेट्टी ऑफिसर- (सुभेदार मेजर) या पदापर्यंत बढती मिळू शकेल. परीक्षा देऊन त्यास पुढे कमिशन्ड ऑफिसरही होता येईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी अर्ज स्व: हस्ताक्षरात आणि इंग्रजी कॅपिटल अक्षरात भरावा. उमेदवारांनी फक्त एकाच पदासाठी अर्ज करावा. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त साध्या पोस्टानेच पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) वयाच्या पुराव्यासाठी १० वी चे प्रमाणपत्र २)१० वी चे गुणपत्र ३) १२ वी प्रमाणपत्र व गुणपत्र ४) एन.सी.सी प्रमाणपत्र (असल्यास) ५) क्रिडा प्रमाणपत्रे ६) Domicile ६) २२ x १० सें.मी. आकाराचे स्वत:चे पत्ते लिहिलेल दोन लिफाफे पैकी एकावर रु.१०/- चे पोस्टाचे तिकिट लावलेले असावे. ७) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी निळी बॅकराऊंड असलेला पासपोर्ट आकाराचा चिकटवावा फोटो असाच आणखी एक निळी बॅकराऊंड असलेला फोटो अर्जासोबत जोडावा. या फोटोच्या पाठीमागे उमेदवाराने स्वतःचे नाव लिहावे व सही करावी. उमेदवारांनी अर्जासोबत वरील क्रमानुसार प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जाड दोऱ्याने घट्ट बांधाव्यात व मुळ प्रती निवडीच्या वेळी सादर कराव्यात. उमेदवारांनी आपले अर्ज खाकी रंगाच्या लिफाफ्यातूनच पाठविणे आवश्यक. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर अभ्यासक्रमाचे नाव तसेच खेळाचे नांव आणि कोणत्या पातळीवर खेळले ते लिहावे. उदा. Direct Entry Petty Officer / Chief Petty Officer-02/2024 KABBADI-NATIONAL LEVEL असे लिहावे. अधिक माहिती साठी उमेदवारांनी joinindiannavy.nic.in ही वेबसाईट पहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – THE SECRETARY, INDIAN NAVY SPORTS CONTROL BOARD, 7TH FLOOR, CHANKYA BHAVAN, NAVAL HEADQUARTERS, MINISTRY OF DEFENCE, NEW DELHI-110021.
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक २० जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *