इंडियन बँक्स असोशिएन्स : मॅनेजर्स २०२४ - govtjobsu.com

इंडियन बँक्स असोशिएन्स : मॅनेजर्स २०२४

omkar
4 Min Read

इंडियन बँक्स असोशिएन्स, मुंबई : मॅनेजर्स पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १२ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – मॅनेजर

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

२) पदाचे नाव – मॅनेजर (पीएस ॲण्ड बीटी)

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार एमसीए उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार बी.एस्सी (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

३) पदाचे नाव – मॅनेजर (लिगल)

पदसंख्या – 

पात्रता – उमेदवार एलएलबी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

वयोमर्यादा – दि. ०१ मे २०२४ रोजी उमेदवाराचे वय २५ ते ३५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन दिव्यांग(अपंग) १० वर्षे, ओबीसी दिव्यांग(अपंग) १३ वर्षे, तर अजा/अज दिव्यांग(अपंग) उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४५६००-१०८९००/- द.म. अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारास सर्व त्या सोयी, सवलती व भत्ते प्रदान करण्यात येतील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. १ मे २०२४ रोजीचे धरले जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेले गुण आणि अनुभव यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीमधील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ ईमेल/एस.एस.एसद्वारे कळविण्यात येईल. मुलाखती वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती आणि फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.iba.org या वेबसाईटवरून दि. १२ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिकट बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो), काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व विहित नमुन्यातील स्वहस्ताक्षरामध्ये लिहिलेले डिक्लरेशन (काळ्या शाईच्या पेनेन लिहिलेले) स्कॅन करुन अपलोड करावे व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिकट बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो), सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा २) विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरामध्ये लिहिले डिक्लरेशन (काळ्या शाईच्या पेनने लिहलेले) ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) आधार क्रमांक उमेदवारांनी निवडीच्याच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, दिव्यांग (अपंग) असल्यास तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी मुलाखती वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.iba.org ही वेबसाईट पाहावी.

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १२ जून २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *