इंडियन आर्मी : शॉर्ट सर्व्हिस कमिशन रिमाऊंट व्हेर्टनरी कोअर पदांसाठी पदवी उत्तीर्ण पुरुष उमेदवारांकडून दि. २० मे २०२४ पूर्वी फक्त टंकलिखित स्वरुपात अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
भरती प्रकार – Short Service Commis – sion (Remount Veternary Corps Of Indian Army)
पात्रता – उमेदवार BVSc/ BVSc & AH पदवीधारक असावा. टक्केवारीची अट नाही. तसेच इंटर्नशिप पुर्ण केलेली असणे आवश्यक. या विषयातील उच्च पदवीधर किंवा पीएचडी व्हेटर्नरी कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २० मे २०२४ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३२ पर्यंत असावे. जर उमेदवाराचे वय ३० च्या आत असेल तर उमेदवाराचा विचार परमनंट कमिशनसाठी केला जाईल. मात्र अशा उमेदवारांना खात्यांतर्गत चाचणी द्यावी लागेल.
वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना ₹१५६००- ३९१००/- + ग्रेड पे ₹६१०० + मिलिटरी सर्व्हिस पे ₹ १५५०० असे वेतन अदा केले जाईल. याशिवाय नॉन प्रॅक्टीसिंग भत्ता मुळ वेतनाच्या २० % दिला जाईल. तसेच सेवेच्या काळात विनामूल्य वैद्यकीय सेवा, स्वतःसाठी तसेच अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी सवलतीच्या दरात प्रवास, ग्रुप हाऊसिंगचे फायदे, विमा इ. सोयी, सवलती देण्यात येतील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड SSB मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. ही चाचणी परीक्षा २ विभागात घेतली जाईल. पहिल्या विभागातील अनुत्तीर्ण उमदेवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाईल. तर यशस्वी उमेदवारांची ग्रुप टेस्ट, सायकॉलॉजीकल टेस्ट व मुलाखत घेतली जाईल. या चाचणीचा कालावधी एकूण ५ दिवस असेल. एकूण उपलब्ध जागांची संख्या, उमेदवाराला मिळालेले गुण आणि शारिरीक क्षमता यावर आधारित अंतिम निवड केली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
प्रशिक्षण – निवड झालेल्या उमेदवारांना कॅप्टन पदावर नियुक्त केले जाईल आणि त्यांना RVC सेंटर ॲण्ड कॉलेज, मिरत कॅन्टॉन्मेट या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल.
बढतीच्या संधी – उमेदवारांना मेजर पदापर्यंत बढती मिळु शकते
सेवा कालावधी – सुरवातीचा सेवा कालावधी ५ वर्षांचा असेल. पुढे तो आणखी ५ वर्षे वाढविता येईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात टंकलिखीत स्वरुपात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज साध्या/ रजिस्टर/ स्पीड पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) BVSc/BVSc & AH पदवी ओरिजिनल/प्रोव्हिजनल प्रमाणपत्र BVSc/ BVSc & AH ची ओरिजिनल / प्रोव्हिजनल प्रमाणपत्र नाहित अशा उमेदवारांनी संबंधित कॉलेजच्या प्रिन्सिपलने दिलेले। पदवी/उच्चपदवी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे) २) BVSc/BVSc & AH पदवीचे अंतिम गुणपत्र ३) इंटर्नशिप प्रमाणपत्र, ४) वयाच्या पुराव्यासाठी १०वी चे प्रमाणपत्र ५) व्हेटर्नरी कौन्सिलमधील नोंदणीपत्र ६) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला फोटो चिकटवावा. उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच स्वतःचा पत्ता लिहिलेले आणि योग्य किंमतीचे पोस्टाचे तिकीट लावलेले २ लिफाफे जोडावेत. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठवणार त्या लिफाफ्यावर तांबड्या शाईत “Application for Short Service Commission in IN RVC” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/महामंडळाच्या सेवेतील उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत व अर्जासोबत संबंधित कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – Directorate General, Remount Veterinary Services (RV-1), QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army), West Block 3, Ground Floor, Wing No-4, RK Puram, New Delhi-110066..
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक – दि. २० मे २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *