इंडियन आर्मी : लॉ ऑफिसर्स : पदवी २०२४ - govtjobsu.com

इंडियन आर्मी : लॉ ऑफिसर्स : पदवी २०२४

omkar
5 Min Read

इंडियन आर्मी : जज्ज अँडव्होकेट पदांसाठी एल.एल.बी उत्तीर्ण अविवाहित पुरूष व अविवाहित महिला उमेदवारांकडून दि. १३ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. 

 

पदभरतीचे ठिकाण – जज्ज अँडव्होकेट जनरल विभाग

पदसंख्या – १० (पुरूष ०५, महिला ०५),

पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांनी एल.एल.बी. उत्तीर्ण असावा. (पदवीनंतरची ३ वर्षे किंवा १२ वी नंतरची ५ वर्षे कालावधीचा). बार कौन्सिलमध्ये नोंदणी असणे आवश्यक. क्लॅट पीजी २०२४ परीक्षेस बसलेला असावा.

शारीरिक पात्रता – पुरूष उमेदवारांची उंची १५७.५ सें.मी. वजन उंचीच्या प्रमाणात तर महिला उमेदवारांची उंची १५२ सेंमी. व वजन ४२ कि.ग्रॅ., डोंगराळ भागातील उमेदवारांना उंचीमध्ये ५ सें.मी. सवलत.

वयोमर्यादा – दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते २७ वर्षापर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००४ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.

वेतनश्रेणी – प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण होताच उमेदवारांना रु.१५,६००-३९,१००+ ग्रेड पे रु.५,४०० + मिलिटरी सव्र्हस पे रु.१५,५०० अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय कुटुंबास विनामुल्य वैद्यकीय सेवा, विनामुल्य प्रवास, ६० दिवसांची वार्षिक रजा, २० दिवसांची किरकोळ रजा, कॅन्टीनच्या सवलती, रेशनिंग सवलत, ७५ लाखांचा विमा इत्यादी सोयी, प्रदान केल्या जातील.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड SSB मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. त्याचे दोन टप्पे असून पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रचाचणी आणि समूहचर्चा यांचा समावेश असेल. जे उमेदवार पहिल्या चाचणीत अयशस्वी होतील त्यांना त्याच दिवशी परत पाठविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुपटास्क चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असेल. यामधील उत्तीर्ण उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल. वैद्यकिय चाचणीमधील अपात्र उमेदवार ४२ दिवसांच्या आत पुन्हा वैद्यकिय चाचणीसाठी मेडिकल बोर्डाच्या अध्यक्षांकडे अर्ज करु शकतात. वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. सदरच्या मुलाखती पाच दिवस चालतील. जे उमेदवार पहिल्यांदाच एसएसबी चाचण्यांसाठी हजर राहतील त्यांना जाता येताचा प्रवासखर्च दिला जाईल. पात्र उमेदवारांची यादी DG भरती कार्यालय तसेच www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

मुलाखत ठिकाण – बेंगलोर, भोपाळ, अलाहाबाद आणि कपुरथाळा

प्रशिक्षण आणि भविष्य – निवड झालेल्या उमेदवारांना ऑफिसर ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षण काळात उमेदवारांना लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल आणि त्यांना सैन्यदलाचे नियमीत वेतन दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘Post Graduate Diploma in Defence Management and Strategic Studies’ अशी मद्रास युनिव्हर्सिटीकडून प्रमाणपत्र मिळेल. शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी उमेदवारास कमीत कमी १० वर्षाची सेवा करावी लागेल. ही सेवा पुढे ४ वर्षापर्यंत वाढविता येईल. पुरुष उमेदवारांना पुढे इच्छा असल्यास परमनंट कमिशनसाठीही जाता येईल. प्रशिक्षण काळात उमेदवारांना लग्न करता येणार नाही.

प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पासपोर्ट/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

प्रथम अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरून दि. १३ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फोटो व सही स्कॅन करुन अपलोड करावी. अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. उमेदवारांना दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०३.३० नंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट डाऊनलोड करता येईल. उमेदवारांनी अर्जाची दोन प्रतीत प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे (क्लॅट पीजी २०२३ स्कोअरकार्डसह) ३) आधार कार्ड ४) बार कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटवर स्वसाक्षांकित केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. उमेदवारांनी निवडीच्यावेळी अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरीलसर्व प्रमाणपत्रे, असल्यास क्रिडा प्रमाणपत्र असल्यास एन.सी.सी. प्रमाणपत्र इ. आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व त्यांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रतींचे २ सेट निवडीच्या वेळेस सादर करावेत. २ फोटो मुलाखतीच्यावेळी सोबत न्यावेत. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in ही वेबसाईट पाहावी.

 

ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा अंतिम दिनांक – १३ ऑगस्ट २०२४ दुपारी ०३.०० पर्यंत

ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट डाऊनलोड करण्याचा दिनांक – १३ ऑगस्ट २०२४ दुपारी ०३.३० नंतर.

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *