इंडियन आर्मी – दंतवैद्यकिय अधिकारी पदांसाठी NEET (MDS) २०२४ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – दंत वैद्यकिय अधिकारी, आर्मी डेंटल कॉर्स,
पदाचा प्रकार – शॉर्ट सर्व्हिस कमिशन
पदसंख्या – ३०
पात्रता – उमेदवार BDS / MDS उत्तीर्ण असावा. मात्र, BDS च्या अंतिम वर्षास ५५% गुण असणे आवश्यक. याशिवाय उमेदवारांनी ३० जून २०२४ पूर्वी १ वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वैध असलेले डेंटल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. तसेच उमेदवार NEET (MDS) 2024 परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत असावे.
शारिरीक पात्रता – पुरुष उमेदवार – उंची – १५७ सें.मी., वजन ४९.५ कि. ग्रॅ., महिला उमेदवार – उंची – १५२ सें. मी. , वजन – ४२ कि. ग्रॅ.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१५,६००-३९,१०० + ग्रेड पे ₹ ६,१०० + मिलिटरी सर्व्हिस पे ₹१५,५००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय आर्मीच्या सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान करण्यात
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची NEET (MDS) 2024 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यामधील उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. मुलाखतीसाठी पहिल्यांदाच येणाऱ्या उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹२००/- अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक.उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरुन दि. ०५ जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधारकार्ड उमेदवारांनी निवडीच्या वेळेस ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊटसोबत वरील प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी joinindianarmy.nic.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५ जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *