Indian Air Force : Agniveer Athletes - govtjobsu.com

Indian Air Force : Agniveer Athletes

omkar
8 Min Read

एअरफोर्स: अग्निवीर (खेळाडू) पदांसाठी १२ वी/डिप्लोमा इ. उत्तीर्ण अविवाहित पुरुष उमेदवारांकडून दि. २२ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे,

 

पदाचे नांव – अग्रिवीर वायू (खेळाडू)

क्रिडा प्रकार – • ॲथलेटीक्स • डेक्थलॉन • लॉग जम्प • ११० मी हर्डल • हाय जम्प • १००/२०० मी • जॅव्हलीन थ्रो • ३००० मी स्टीपल चेस • पोल हॉल्ट • ५०००/ १०००० मी • हॅमर थ्रो • बास्केटबॉल – सेंटर/ पॉवर फॉरवर्ड / पॉईंट गार्ड • बॉक्सिंग ● +९२ किग्रॅ / ६३.५-६७ किग्रॅ / ५१-५४ किग्रॅ / ४६-४८ किग्रॅ / ६०-६३.५ किग्रॅ • क्रिकेट मेडीअम फास्ट बॉलर/ टॉप ऑर्डर बॅट्समन / ऑल राउंडर • सायकल पोलो – डिफेंडर/ फॉरवर्ड • सायकलिंग – इंडीव्हीज्युअल परस्युट • फुटबॉल – फॉरवर्ड / डिफेंडर • गोल्फ • जिमनेस्टीक्स – ऑल राऊंडर • हॅण्डबॉल – लेफ्ट विंग / पिओट/ गोलकिपर • हॉकी – फॉरवर्ड/ डिफेंडर • कब्बडी – राईट रायडर / लेफ्ट रायडर/ ऑल-राऊंडर/ लेफ्ट डिफेंडर/ राईट डिफेंडर • लॉन टेनीस – सिंगल / डब्बल • स्क्क्रॅश – सिंगल • स्विमिंग / डायव्हींग – हाय बोर्ड ड्रायव्हर/ बटरफ्लाय १०० मी ॲण्ड २०० मी / : २०० मी ॲण्ड ४०० मी / बॅक स्ट्रोक – ५० मी/१०० मी/२०० मी/ फ्रि स्टाईल – ५० मी/ १०० मी/ २०० मी/ ४०० मी/ मी • हॉलीबॉल – सेटर/ब्लॉकर / युनिव्हर्सल / ॲटेकर • वॉटर पोलो – गोलकिपर / ऑल राऊंडर/ सेटर फॉरवर्ड/ फूल बँक • वेटलिफ्टींग – ५५ किग्रॅ / ६१ किग्रॅ / ७३ किग्रॅ / ८१ किग्रॅ / ९६ किग्रॅ / १०९ किग्रॅ / + १०९ किग्रॅ • वेटलिफ्टींग – ग्रीको रोमन – ६३ किग्रॅ / ७७ किग्रॅ / ८७ किग्रॅ फ्रि स्टाईल – ७० किग्रॅ / ७४ किग्रॅ / १२५ किग्रॅ • वुशु (पुरुष) – संदा – ५६ किग्रॅ / ६० किग्रॅ / ६५ किग्रॅ / ८० किग्रॅ, ताऊलो

शैक्षणिक पात्रता – सायन्स पात्रता – उमेदवार सरासरी ५० % गुणांसह १२ वी सायन्स (फिजीक्स, गणित आणि इंग्रजी) उत्तीर्ण असावा. परंतू इंग्रजी विषयासही ५०% गुण असणे आवश्यक. किंवा उमेदवार सरासरी ५० % गुणांसह इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/आयटी) उत्तीर्ण असावा. परंतू इंग्रजी विषयासही ५०% गुण असणे आवश्यक. ज्या उमेदवारांनी डिप्लोमामध्ये इंग्रजी विषय अभ्यासलेला नाही अशा उमेदवारांना १० वी /१२ वीस इंग्रजी विषयात ५० % गुण असणे आवश्यक. किंवा ५० % गुणांनी फिजीक्स, गणित आणि इंग्रजी विषयासह २ वर्षे कालावधीचा व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण असावा.परंतू इंग्रजी विषयासही ५०% गुण असणे आवश्यक.ज्या उमेदवारांनी व्होकेशनल अभ्यासक्रमा मध्ये इंग्रजी विषय अभ्यासलेला नाही अशा उमेदवारांना १० वी /१२ वीस इंग्रजी विषयात ५० % गुण असणे आवश्यक.

सायन्स वगळून इतर पात्रता – उमेदवार सरासरी ५०% गुणांसह कोणत्याही शाखेमधुन १२ वी उत्तीर्ण असावा, परंतू इंग्रजी विषयासही ५०% गुण असणे आवश्यक.

क्रिडा पात्रता – आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधत्व केलेले खेळाडू/ वैयक्तीक खेळामध्ये ज्युनिअर नॅशनल खेळामध्ये ५ वे स्थान प्राप्त केलेले खेळाडू / वैयक्तीक खेळामध्ये सिनिअर नॅशनल खेळ/आंतर विद्यापीठ /खेलो इंडिया नॅशनल खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधत्व केलेले खेळाडू/ सांधीक खेळामध्ये ज्युनिअर/नॅशनल खेळ/ आंतर विद्यापीठ / खेलो इंडिया नॅशनल मध्ये राज्याचे प्रतिनिधत्व केलेले खेळाडू

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २७ जून २००३ ते २७ डिसेंबर २००६ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता – उंची १५२.५ सें.मी. असणे आवश्यक, छाती कमीत कमी ५ सें.मी. फुगणे आवश्यक. वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे. उमेदवाराकडे रातांधळेपणा, रंगांधळेपणा नसावा तसेच उमेदवाराची कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी. श्रवण क्षमता चांगली असावी. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदरुस्त असावा.

वेतनश्रेणी – प्रशिक्षण काळात उमेदवारांना पहिल्यावर्षी ₹ ३०,०००/- द. म, दुसऱ्या वर्षी ₹३३,०००/- द. म, तिसऱ्यावर्षी ₹३६,५००/- द. म तर चौथ्या वर्षी ₹४०,०००/- द. म असे वेतन अदा केले जाईल. वेतनश्रेणीशिवाय रेशन, कपडे, राहण्याची सोय, ३० दिवसांची वार्षिक रजा, स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी विनामूल्य वैद्यकीय सेवा, सवलतीच्या दरात प्रवास, ४८ लाखांचा विमा इ. सोयी व सवलती दिल्या जातील. ४ वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना १०.४ लाख इतका सेवा निधी पॅकेज दिले जाईल.

सेवा कालावधी – उमेदवारांची नेमणूक ०४ वर्षांची असेल. ४ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केल्या नंतर उमेदवारास हवाई दलामार्फत स्कील प्रमाणपत्र अदा केले जाईल. ज्याच्या आधारावर उमेदवारास इतर नोकरी साठी प्रयत्न करताना प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही स्थितीत उमेदवारास निवृत्त सैनिकाचा दर्जा दिला जाणार नाही.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड क्रिडा पात्रता आणि शारिरीक क्षमता चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची क्रिडा पात्रता चाचणी घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणी घेतली जाईल. शारिरीक क्षमता चाचणी मध्ये १.६ किमी धाव ५ मि. ४५ सेकंदामध्ये पार करणे, १० पुश अप्स, १० सीट अप्स, २० स्क्वॉट्स या चाचण्या घेतल्या जातील.

परीक्षा दिनांक – ११ मार्च – २१ मार्च २०२४,

प्रवेशपत्राबाबत- उमेदवारांना मार्च मध्ये प्रवेशपत्र ई-मेल तसेच वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्राच्या रंगीत प्रतीसह सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹१००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/ क्रेडीट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. याशिवाय उमेदवार ॲक्सीस बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरू शकतात.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक उमेदवारांनी www.agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवरून दि. १३ फेब्रुवारी २०२४ ते दि. २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताचा अंगठा व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. किंवा चलनाची प्रिंट काढून ॲक्सीस बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. उमेदवारांची अर्जाची रंगीत प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला अलीकडील काळात काढलेला ०१ जानेवारी २०२४ नंतर काढलेला फोटो (उमेदवारांनी फोटो काढताना काळ्या पाटीवर स्वत:चे नाव आणि फोटो काढलेला दिनांक कॅपीटल अक्षरात पांढऱ्या खडूने लिहिणे आवश्यक) २) सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ३) क्रिडा प्रमाणपत्रे ४) १० वी प्रमाणपत्र ५) १२ वी गुणपत्र ६) इंजि. डिप्लोमा गुणपत्रे ७) उमेदवार १८ वर्षाखालील असल्यास पालकांची सही ८) आधारकार्ड

उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीवेळी ऑनलाईन अर्जाच्या रंगीत प्रिंटाऊट, प्रवेशपत्राची रंगीत प्रत, सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व प्रत्येकी ४-४ स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे ०८ फोटो, असल्यास अधीक एन.सी.सी. प्रमाणपत्राची मुळ प्रत व ४ स्वसाक्षांकित प्रती, पात्रता आणि इतर गुणवत्ता असल्यास तसे मुळ प्रमाणपत्र व ४ स्वक्षांकित प्रती, एअरफोर्समधील सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलांनी तसे प्रमाणपत्र/डिस्चार्ज बुक आणि त्याच्या ४ स्वसांक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी  www.agnipathvayu.cdac.in किंवा careerinindianairforce.cdac.in ही वेबसाईट पाहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दि. १३ फेब्रुवारी २०२४ ते दि. २२ फेब्रुवारी २०२४

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *