इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई : ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफीसर्स पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफीसर्स
पदसंख्या – १७ (ओपन १०, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ४, अज १)
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान ४ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. संगणकाचे ज्ञान आवश्यक किंवा उमेदवार कोणत्याही शाखेची उच्च पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ०७ जून २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय ३२ वर्षापर्यंत असावे. अजा/अज/ओबीसी/अपंग/माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹३५४००-११२४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, पात्रता इ. दि. ०७ जून २०२४ रोजीची धरली जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्ट द्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत ६०% गुण मिळवणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. स्कील टेस्ट मधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावे. ऑनलाईन परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची साक्षांकीत प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹५०/- अशी असून ती नेटबँकींग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा. उमेदवारांनी www.iitb.ac.in या वेबसाईटवरून दि. ०७ जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांची ऑनलाईन अर्जामध्ये स्वतःची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) फोटो असलेलेल ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) ५) जातीचा दाखला ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, वरील सर्व प्रमाणपत्रे इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.iitb.ac.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. ०७ जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *