इंडियन इस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगर (गुजरात) : असिस्टंट, स्टाफ नर्स इ. पदांसाठी पदवी/ डिप्लोमा इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १५ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ज्युनिअर लॅबोरेटरी असिस्टंट,
पदसंख्या – १५ (ओपन १०, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अज १) पैकी अस्थिव्यंग २
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी इंजि डिप्लोमा उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट,
पदसंख्या – ११ (ओपन ४, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा १, अज २) पैकी अल्पदृष्टी १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नाव – ज्युनिअर अकौंट्स असिस्टंट,
पदसंख्या – ४ ( ओपन ३, ओबीसी १ ) पैकी अल्पदृष्टी १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
४) पदाचे नाव – असिस्टंट स्टाफ नर्स,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा तसेच जीएनएम उत्तीर्ण असावा. नर्सिंग कौन्सीलकडे नोंदणी असणे आवश्यक. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
५) पदाचे नाव – लायब्ररी इन्फर्मेशन असिस्टंट,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी उच्च पदवी (लायब्ररी सायन्स/ इन्फर्मेशन सायन्स/डॉक्युमेंटेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
६) पदाचे नाव – असिस्टंट इंजिनिअर (सिव्हील/इलेक्ट्रीकल),
पदसंख्या – ओपन २
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक (सिव्हील/ इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
७) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील/इलेक्ट्रीकल),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी इंजि डिप्लोमा (सिव्हील/ इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
८) पदाचे नाव – ज्युनिअर सुप्रिटेंडंट,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी उच्च पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. १५ जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय पद क्रमांक १ ते ५ साठी २७ वर्षांपर्यंत तर पद क्रमांक ६ व ७ साठी ३२ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. दिव्यांग (अपंग)/माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५० वर्षांपर्यंत सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ ते ३ साठी रु.२१,७००६९,१००/-, पद क्रमांक ४ व ५ साठी रु.२९,२००-९२,३००/ – तर पद क्रमांक ६ व ७ साठी रु.३५,४००-१,१२,४००/अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/ मुलाखतीद्वारे केली जाईल. निवडीबाबत उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल. निवडीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल / एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती, फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.iitgn.ac.in या वेबसाईटवरून दि. १५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) वयाचा दाखला ५) जात प्रमाणपत्र ६) दिव्यांग (अपंग) असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ८) अनुभव प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.iitgn.ac.in ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १५ जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *