UPSC : केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या IAS / IPS / IFS/IRS परीक्षेच्या विनामुल्य प्रशिक्षणासाठी सॅक, मुंबई, भरती सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, नाशिक, नागपूरम अमरावती, औरंगाबाद या सहा केंद्रातील प्रवेशासाठी पदवी उत्तीर्ण/पदविच्या अंतिम सत्रास बसलेल्या उमेदवारांकडून दि. २८ जून २०२४ पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
परीक्षेचे नांव – UPSC नागरी सेवा परीक्षा २०२५ च्या पूर्व तयारीसाठी परीक्षा पुर्व प्रशिक्षण मागवि कार्यक्रम – २०२५
प्रशिक्षणाचा कालावधी – ११ महिने,
एकुण पदसंख्या – ६३५ (केंद्रातील क्षमता – ५७५, अल्पसंख्याक अनुदानित – ५०, टीआरटीआय पुणे १०)
प्रशिक्षण केंद्रानुसार पदविभागणी
१) राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई – ११० (केंद्रातील क्षमता १०) १००, अल्पसंख्याक अनुदानित-
२) भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर – ७० (केंद्रातील क्षमता ६०, अल्पसंख्याक अनुदानित – १०)
३) भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, यशदा पुणे – ४० (केंद्रातील क्षमता २०, अल्पसंख्याक अनुदानित- – १०, टीआरटीआय पुणे – १०)
४) भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर – ११० (केंद्रातील क्षमता १००, अल्पसंख्याक अनुदानित-१०) –
५) भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजी नगर/ औरंगाबाद – ७० (केंद्रातील क्षमता – ६०, अल्पसंख्याक अनुदानित-१०)
६) भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक – ६०,
७) भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती – ६०,
८) पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले ॲकेडमी, पुणे – ५०,
९) अंबरनाथ नगरपरीषद संचलित युपीएससी, स्पर्धा परिक्षा केंद्र, अंबरनाथ २५,
१०) ठाणे महानगरपालिका संचालित सी.डी. देशमुख युपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र, ठाणे – ४०,
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. वैद्यकिय पदवी धारकांनी Intership पूर्ण करणे आवश्यक किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सेमिस्टर परीक्षेला’ बसलेला आगे आणि ज्यांचे निकाल प्रलंबित आहेत. अशा उमेदवारांनी प्रवेशाच्या वेळी ट्रांसफर सर्टिफिकेट देणे बंधनकारक राहील.
वयोमर्यादा – दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३२ वर्षे या दरम्यान असावे. वयामध्ये अजा, अज उमेदवारांना ३७ पर्यंत, तर (आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ओबीसी/विजा/भज/विमाप्र) ३५ वर्षांपर्यंत सवलत.
विद्यावेतन – प्रवेशित विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार देण्यात येईल.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची, २०० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. यात विभाग १ सामान्य अध्ययन (५० प्रश्न, १०० गुण) आणि विभाग २ CSAT (४० प्रश्न, १०० गुण) असेल. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण वजा केले जातील. उमेदवारांची निवड विभाग १ मधील प्राप्त गुणांच्या आधारेच करण्यात येईल. मात्र उमेदवारांनी विभाग २ मध्ये कमीतकमी ३३ % गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची ५० गुणांची मराठी/ हिंदी / इंग्रजी माध्यमामध्ये मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील यशस्वी उमेदवार ११ महिन्याच्या पुर्णवेळ विनामुल्य प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील. सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in ही वेबसाईट पहावी.
प्रवेश परीक्षा दिनांक व वेळ – परीक्षा रविवार दि. ०४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत घेतली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे २ फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांना रू.६००/-, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ओबीसी/विजाभज / विमाप्र / अजा/अज उमेदवारांना रू. ४००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकींग / क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. त्यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.siac.org.in या वेबसाईटवरुन दि. २८ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकच प्रवेश केंद्र निवडावे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) पदवी गुणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई-रिसीट, सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, एस.ई.बी.सी/ओबीसी/विमाप्र /वि.जा/भ.ज व महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. २८ जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
महत्त्वाच्या सूचना – १) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाभागातील रहिवासी असल्यास त्याची मातृभाषा मराठी असणे आवश्यक. २) यापूर्व प्री आयएएस च्या प्रारंभिक अथवा मुख्य परीक्षा प्रशिक्षण सत्राचा लाभ घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेस बसता येणार नाही. ३) संस्थेच्या संपूर्ण प्रशिक्षण काळात उमेदवारास नोकरी अथवा इतर अभ्यासक्रमात सहभाग घेता येणार नाही. ४) ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग शासनाच्या परवानगीने सुरु करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यास अल्पसंख्यांक, बार्टी व स्थानिक रहिवासी वगळून इतर उमेदवारांना उपलब्धतेनुसार गुणांनुक्रमे वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल.