हिंदुस्थान पेट्रोलियम राजस्थान रिफायनरी लि. : १०० एक्झीक्युटीव्ह इ. पदांसाठी डिप्लोमा/पदवी/सीए उमेदवारांकडून दि. ०४ ऑक्टोबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ज्युनिअर एक्झेक्युटीव्ह (फायर अँण्ड सेफ्टी)
पदसंख्या – ३७
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५०% गुणांनी) इंजि डिप्लोमा/बी.एस्सी उत्तीर्ण असावा. जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक. फायर/सेफ्टी/फायर अँण्ड सेफ्टी चा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – ज्युनिअर एक्झेक्युटीव्ह (मेकॅनिकल),
पदसंख्या – ४
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५०% गुणांनी) इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – असिस्टंट अकौंट्स ऑफीसर,
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार ५०% गुणांनी सीए परीक्षा उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – असिस्टंट इंजिनिअर (केमिकल प्रोसेस),
पदसंख्या – १२
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक (केमिकल/पेट्रोकेमिकल) उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नाव – इंजिनिअर (मेकॅनिकल),
पदसंख्या – १४
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक (मेकॅनिकल/मेकॅनिकल अँण्ड प्रोडक्शन/प्रोडक्शन) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
६) पदाचे नाव – इंजिनिअर (केमिकल प्रोसेस),
पदसंख्या – २७
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक (केमिकल/पेट्रोकेमिकल) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
७) पदाचे नाव – इंजिनिअर (फायर अँण्ड सेफ्टी),
पदसंख्या – ४
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५०% गुणांनी) बीई/बीटेक (फायर इंजि./फायर अँण्ड सेफ्टी इंजि.) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवारांची वयोमर्यादा २६ ऑगस्ट २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पद क्रमांक १ ते ४ साठी १८ ते २५ वर्षांपर्यंत तर पद क्रमांक ५ व ७ साठी १८ ते २९ वर्षांपर्यंत असावे. अनु. जाती/जमातींना वयात ५ वर्षे तर ओबीसींना क्यात ३ वर्षे सवलत. तर ओपन अपंग १० वर्ष, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग १५ वर्षे वयामध्ये सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ व २ साठी रु.३०,०००१,२०,००० /-, पद क्रमांक ३ व ४ साठी रु.४०,०००१,४०,००० /- तर पद क्रमांक ५ ते ७ साठी रु.५०,०००१,६०,००० /- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणी शिवाय उमेदवारास हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या सर्व त्या सोयी, सवलती, भत्ते प्रदान करण्यात येतील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) शैक्षणिक पात्रतेमध्ये अजा/अज/अपंग उमेदवारांना १०% सवलत. ३) उम्र पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व स्कील टेस्ट याद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असून त्यामध्ये जनरल अँप्टीट्यूड, टेक्नीकल / संबंधित व्यावसायिक ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी असेल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रेतपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल/ एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती, फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.११८०/- अशी असून ती नेटबँकिंग / क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज /अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://www.hrrl.in/ या वेबसाईटवरून दि. ०४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ५) आधार क्रमांक (असल्यास) उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी https://www.hrrl.in/ ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *