हिंदूस्थान पेट्रोलिअम : इंजिनिअर्स पदांसाठी डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १५ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – ज्युनिअर एक्झीक्युटीव्ह – केमिकल
पदसंख्या – ६० (ओपन २५, ईडब्ल्यूएस ६, ओबीसी १६, अजा ९, अज ४)
पात्रता – उमेदवार किमान ६० % – (अजा/अज/ दिव्यांग (अपंग) – ५० %) गुणांनी इंजि. डिप्लोमा (केमिकल इंजि./पेट्रोकेमिकल इंजि./ केमिकल इंजि. (फर्टीलायझर्स)/केमिकल इंजि. (प्लास्टीक ॲण्ड पॉलीमर)/ केमिकल इंजि. (शुगर टेक्नॉलॉजी) / रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल इंजि./केमिकल इंजि. (ऑईल टेक्नॉलॉजी)/केमिकल इंजि. (पॉलीमर टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार किमान ६० % (अजा/अज/ दिव्यांग (अपंग) – ५०%) बी.एस्सी (केमिस्ट्री/पॉलीमर केमिस्ट्री/इंडस्ट्रीअल केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा दि. ११ मार्च २०२४ रोजी २५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन दिव्यांग (अपंग) १० वर्षे, ओबीसी दिव्यांग (अपंग) १३ वर्षे, तर अजा/अज दिव्यांग (अपंग) उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹३०,०००-१,२०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सर्व सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ११ मार्च २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्कील टेस्टद्वारे आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतील. पेपर १ मध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित, आणि इंग्रजी भाषा या विषयांवर आधरित प्रश्न विचारले जातील तर पेपर २ मध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेण्यात येईल. स्कील टेस्टमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, ग्रुप टेस्ट आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यामधील उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन आणि कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या अजा/अज/दिव्यांग (अपंग) उमेदवारांना नियामप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रोबेशन कालावधी – १ वर्ष
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹११८० (परीक्षा फी ₹१०००/- + जी.एस.टी ₹१८०)/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/ क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://www.hrrl.in/ वेबसाईटवरून दि. १५ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व बायोडाटा स्कॅन करुन अपलोड करावा व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) जातीचा दाखला ५) अपंग असल्यास तसा दाखला ६) पॅन कार्ड ७) आधार क्रमांक ८) बायोडाटा उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी https://www.hrrl.in/ ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १५ एप्रिल २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या स्वसाक्षांकित व मूळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.